ETV Bharat / city

'विक्रेत्यांना सायंकाळी देखील दूध विक्रीची परवानगी द्या' - Milk sell in Mumbai

सध्या राज्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार कडून ज्या गाइडलाइन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी तसेच सर्व खाद्य दुकाने सकाळी सात ते अकरा यादरम्यानच सुरू असतात. याच वेळात दूध विक्री करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे.

Sanjay nirupam
Sanjay nirupam
author img

By

Published : May 7, 2021, 9:13 PM IST

मुंबई - सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दूध विक्रेत्यांना दूध विक्रीसाठी मुभा देण्यात यावी, यासाठी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना विनंती पत्र लिहिले आहे. सध्या राज्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार कडून ज्या गाइडलाइन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी तसेच सर्व खाद्य दुकाने सकाळी सात ते अकरा यादरम्यानच सुरू असतात. याच वेळात दूध विक्री करण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे.

दूध विक्री करणाऱ्यांना संध्याकाळी 4 ते 7 या वेळेदरम्यान दूध विक्री करण्यासाठी मुभा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली आहे. गाई आणि म्हशी दिवसातून दोन वेळा दूध देतात. मात्र सध्या राज्यामध्ये सगळीकडेच लॉकडाऊन लागलेला आहे. या कडक लॉकडाऊनमुळे फक्त सकाळी सात ते अकरा या दरम्यान दूध विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व दूध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 चार तासातच दूध विक्री करावी लागते. पण गाई आणि म्हशी संध्याकाळच्या वेळेस जे दूध देतात ते दूध विक्रेत्यांना संध्याकाळी विकता येत नाही. त्यामुळे जवळपास पन्नास टक्के दूध वाया जाते. यामुळे दूध विक्रेत्यांना प्रचंड नुकसान होत असल्याचा संजय निरुपम यांनी आपल्या पत्रातून मंत्री सुनील केदार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांचं दूध वाया जाऊ नये आणि त्यांना आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दूध विक्रेत्यांना सायंकाळी चार ते सात असे अधिकचे तीन तास दूध विक्री करण्यास मुभा देण्यात यावी, अशी विनंती संजय निरुपम यांनी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना केलेल्या पत्राद्वारे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.