ETV Bharat / city

Mahesh Tapase : अनिल देशमुखांवरील शंभर कोटींचे आरोप हे राजकीय दृष्टीने प्रेरित, अखेर... - महेश तपासे आणि अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा जामीन मंजूर (Anil Deshmukh granted bail) केला आहे. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर होता; मात्र हे सर्व आरोप राजकीय दृष्टीने प्रेरित (allegations against Anil Deshmukh politically motivated) होते. हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस सांगत होतं. म्हणूनच आज न्यायालयात सत्याचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आहे, संविधानावर आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase on Anil Deshmukh) यांनी व्यक्त केले आहे.

Mahesh Tapase on Anil Deshmukh
Mahesh Tapase on Anil Deshmukh
author img

By

Published : Oct 4, 2022, 5:24 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा जामीन मंजूर (Anil Deshmukh granted bail) केला आहे. शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर होता; मात्र हे सर्व आरोप राजकीय दृष्टीने प्रेरित (allegations against Anil Deshmukh politically motivated) होते. हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस सांगत होतं. म्हणूनच आज न्यायालयात सत्याचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास या देशाच्या न्याय व्यवस्थेवर आहे, संविधानावर आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase on Anil Deshmukh) यांनी व्यक्त केले आहे.

अनिल देशमुखांच्या जामीन मंजूरीबाबत प्रतिक्रिया

देशमुखांवरील आरोपामागे भाजपचे षडयंत्र- जवळपास एक वर्ष अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावे लागला. यामागे भारतीय जनता पक्षात षडयंत्र होतं. शंभर कोटी रुपयांचे केवळ आरोप करण्यात आले; मात्र याबाबतचे कोणतेही पुरावे न्यायालयासमोर सादर करता आलेले नाही. आता केवळ जामीन मिळाला हे मात्र येणाऱ्या काळात अनिल देशमुख या सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं- यावर "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नहीं" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी धरून आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा, त्यांचे राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र न्यायदेवतेने न्याय केला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस कडून म्हणण्यात येत आहे.

काय होता घटनाक्रम? अनिल देशमुखांना मनी लॉडरिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीच्या केसमध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनंतर ईडीनेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.