ETV Bharat / city

पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश, शिक्षणमंत्र्यांची घोषणा - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

varsha-gaikwad
varsha-gaikwad
author img

By

Published : Apr 3, 2021, 3:31 PM IST

Updated : Apr 3, 2021, 5:13 PM IST

15:25 April 03

पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती

माहिती देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विना परीक्षा पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत दुसऱ्या वर्षी सुद्धा शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.  

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

पालकांकडून निर्णय घेण्याची मागणी -

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले होते. शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे.

विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून प्रयत्न -

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये पहिली ते आठवीच्या शाळा आपणास सुरु करता आल्या नाही आणि पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रतक्ष वर्गाध्यापन शक्य झाले. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित “शाळा बंद…पण शिक्षण आहे” अशा स्वरूपात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिक्षण सुरू राहावे म्हणून प्रयत्न सुरू होते. त्याच बरोबर शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिक्षणाशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे प्रयत्न केले गेले. गली गली सिम सिम, टिलीमिली, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.

ऑनलाईन शिक्षणाला प्रतिसाद -

इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेत. राज्यातील शिक्षकही या परीस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सुरू ठेवत आहे. शालेय शिक्षण विभागाचे वतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन स्वरूपाचे सुरू ठेवणेबाबत कळविण्यात आले होते व याला राज्यातील शिक्षकांनी उत्तम स्वरूपात प्रतिसाद दिला. राज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिकणे वेगवेगळ्या मार्गांनी कसे सुरू राहील या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.

नववी ते दहावी संबंधित लवकरच निर्णय-

राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल यासाठी आपण निश्चितच कटिबद्ध राहुया. कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल

Last Updated : Apr 3, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.