ETV Bharat / city

Police Officer Night Duty : मुंबईत आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही करावी लागणार 'नाईट ड्युटी'

author img

By

Published : Mar 30, 2022, 5:23 PM IST

Updated : Mar 30, 2022, 9:26 PM IST

मुंबईतील सर्व सहपोलीस आयुक्तांना 15 दिवसातून एकदा नाईट ड्युटी ( Police Officer Night Duty ) करावी लागणार आहे. तर अतिरिक्त सहपोलीस आयुक्तांना 10 दिवसातून एकदा नाईट ड्युटी करावी लागणार आहे.

Police Officer Night Duty
Police Officer Night Duty

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची ( Police Commissioner Sanjay Pande ) नियुक्ती झाल्यापासून संजय पांडे यांनी वेगवेगळे घोषणा केल्या. प्रथम त्यांनी मुंबईकरांची संवाद साधत मुंबईकरांचा विश्वास पोलीस खात्यावर पुन्हा घट्ट व्हावा, याकरिता प्रयत्न केला होता. तसेच काही समस्या असल्यास थेट त्यांच्याशी संवाद साधण्याकरिता जाहीर केला होता. आज पुन्हा संजय पांडे यांनी पुन्हा एक मोठी घोषणा केली असून कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील नाईट ड्युटी ( Police Officer Night Duty ) करण्यास सांगण्यात आले आहे.

संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे नियमांची घोषणा केली. तसेच त्यांच्या सुविधासाठीदेखील संजय पांडे यांनी मागील रविवारपासून संडेस्ट्रीट नावाने नवीन उपक्रम सुरू केला होता. त्या उपक्रमाला मुंबईकराने उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला होता. मुंबईतील मैदानेमधील गर्दीमुळे अनेक मुंबईकरांना बाहेर मन मोकळं खेळण्यासाठी पण जाता येत नाही. त्यामुळे संजय पांडे यांनी मुंबईतील 13 रस्त्यांवर संडेस्ट्रीट नावाने नवीन उपक्रम सुरु केला होता. त्यामध्ये सायकलिंग, कबड्डी यासारखे विविध खेळ मुंबईकर खेळताना दिसले आहे.

कधीही न झोपणारे शहर अशी मुंबईची ओळख आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस देखील दिवसाप्रमाणेच तगडा पहारा असणे गरजेचे असते. रात्रीच्या वेळेस कुठला अनुचित प्रकार घडू नये, याकरिता उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा नाईट राऊंड शहरात असतो. एसीपी, डिसीपी त्या त्या प्रादेशिक विभागांमध्ये रात्रीची गस्त घालून पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करतात. शिवाय विशेष मोहिम असल्यास ती राबवतात. महत्वाच्या ठिकाणी भेटी, लाँक अप चेक अप करतात. पण यात आता आयुक्तांनी बदल केला आहे. दिवसाप्रमाणे रात्रीचा पहारा देखील अधिक कडक केला आहे.

सहआयुक्त 15 दिवसातून एकदा, अपर पोलीस आयुक्त 10 दिवसातून एकदा, तर डिसीपी आणि एसीपी 7 दिवसातून किमान एकदा नाईट ड्युटी करतील, असा आदेश संजय पांडे यांनी काढला आहे. रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत सह आयुक्त, अपर आयुक्तांना संपुर्ण मुंबईत तर उपायुक्तांना प्रादेशिक विभागात रात्रीची गस्त घालून शहरावर लक्ष ठेवावे लागणार आहे. तसेच मुख्य नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळेल, तशी विशेष मोहिम राबवावी लागणार आहे. आयुक्त स्वतः देखील महिन्यातून एकदा नाईट ड्युटी करणार आहेत.

हेही वाचा - AAP Vs BJP in Maharashtra : आप कार्यकर्त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर हल्लाबोल; प्रवीण दरेंकराविरोधात घोषणाबाजी

Last Updated : Mar 30, 2022, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.