ETV Bharat / city

राज्यातील सर्व रुग्णालयांचे होणार ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन ऑडिट’; मुख्य सचिवांचे निर्देश

author img

By

Published : Apr 23, 2021, 10:57 PM IST

राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर बरोबरच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. तसेच ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टँकरला वळवू नयेत, अशा सूचनाही दिल्या.

सीताराम कुंटे
सीताराम कुंटे

मुंबई - नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायरबरोबरच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे’ निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. तसेच ‘ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणात त्याची वाहतुक करावी आणि परस्पर टँकरला वळवू नयेत’, अशा सूचनाही दिल्या.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सिजन, रेमडेसिवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, ऑक्सिजन उपलब्धतेसाठी अश्वीन मुदगल, ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी दीपेंद्र कुशवाह आणि रेमडेसिवीर उपलब्धतेसाठी विजय वाघमारे उपस्थित होते.

'रुग्णांना ऑक्सिजन द्या'

राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्या. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडीट करावे, असे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. तसेच रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सिजन दिला जातोय का, तो वाया जावू नये, यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे, याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सिजन गळती होत नाही ना, तो वाया जात नाही ना याची पाहणी करावी, अशा सूचना कुंटे यांनी दिल्या आहेत.

'जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घ्या'

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे. जेणेकरून सिलेंडर आणि लिक्विड ऑक्सिजनवरील अवलंब कमी करता येईल, असे मुख्य सचिवांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट उभारावेत, अशा सूचनाही सचिवांनी दिल्या आहेत.

'ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा'

राज्यात ऑक्सिजन टँकरची वाहतुक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलीस संरक्षणात या टँकरची वाहतुक करण्यात यावी कुठल्याही प्रकारे ऑक्सिजन टँकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे सांगतानाच आज रात्री (शुक्रवारी) विशाखापट्टणम् येथून रेल्वेद्वारे ऑक्सिजन टॅंकर येणार असून त्यातील चार नागपूर आणि नाशिक येथे पाठविण्यात येतील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

दरम्यान, मुख्य सचिवांनी राज्यातील उपलब्ध ऑक्सिजनचा आढावा घेतला. राज्यात अन्य ठिकाणांहून जो ऑक्सिजन आणला जात आहे त्याच्या साठवणुकीची सुविधा तयार करावी, असे निर्देशही कुंटे यांनी दिले. शिवाय, रेमडेसिवीर उपलब्धतेबाबत प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.