ETV Bharat / city

जाणून घ्या, कोण आहेत आयपीएस अधिकारी डॉ. रश्मी शुक्ला - maharashtra police

फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय अहवाल सार्वजनिक झाल्यामुळे यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी डॉ रश्मी शुक्ला यांचे नाव समोर आले आहे.

जाणून घ्या, कोण आहेत आयपीएस अधिकारी डॉ. रश्मी शुक्ला

author img

By

Published : Mar 26, 2021, 8:37 PM IST

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी वादात अडकलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईचे संकेत राज्य सरकारकडून दिले जात आहेत. फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय अहवाल सार्वजनिक झाल्यामुळे यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी डॉ रश्मी शुक्ला यांचे नाव समोर आले आहे.

कोण आहेत रश्मी शुक्ला?

  • 15 ऑगस्ट 1965 रोजी मुंबई येथे जन्म
  • शुक्ला यांचे संपूर्ण शालेय शिक्षण मुंबईत झाले
  • 1988 च्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी
  • राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला हे दोघेही 1988 बॅचचे अधिकारी
  • शुक्ला यांनी सिव्हिल डिफेन्सला महासंचालकपदी काम पाहिले
  • राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदाचे कामही रश्मी शुक्लांनी पाहिले आहे
  • रश्मी शुक्ला सध्या सीआरपीएफमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी

    काय आहे प्रकरण?
    25 ऑगस्ट 2020 रोजी डॉ. रश्मी शुक्ला यांनी एक गुप्त अहवाल त्या वेळी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना पाठवला होता. यामध्ये मुख्यमंत्र्यांना या अहवालाची माहिती दिली जावी असा उल्लेख करण्यात आला होता. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख राहिलेल्या डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी पाठविलेल्या पत्रात काही गोष्टींचा खुलासा करत राज्यात पोलीस दलातील निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात याव्यात म्हणून काही एजंट सक्रीय झाले असून यासंदर्भात काही जणांचे फोन कॉल टॅप करण्यात आले होते असं नमूद केलेलं होतं. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज्यात सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले जात असून ही खूपच गंभीर बाब असल्याचे त्यांनी या अहवालात म्हटले होते. डॉक्टर रश्मी शुक्ला यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, अशा प्रकारचे प्रकरण जून 2017 मध्ये समोर आले होते. त्यावेळी या प्रकरणात सात आरोपी दाखवण्यात आले होते.

हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.