ETV Bharat / city

World Health Day in MH : निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करुया - अजित पवारांचे आवाहन - स्वीट महाराष्ट्र उपक्रम

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य सरकारच्या ( World Health Day celebration in MH ) सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने स्वीट महाराष्ट्र उपक्रमाचा ( Sweet Maharashtra initiative ) शुभारंभ करण्यात आला. आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Medical Education Minister Amit Deshmukh ) , आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Apr 7, 2022, 3:46 PM IST

मुंबई - ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो आहे. आपल्या चुकांमुळेच हे संकट उभं राहत आहे. त्यावर मात करण्यासाठी निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करू या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी, असे ही पवार म्हणाले. ते आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य सरकारच्या ( World Health Day celebration in MH ) सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने स्वीट महाराष्ट्र उपक्रमाचा ( Sweet Maharashtra initiative ) शुभारंभ करण्यात आला. आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Medical Education Minister Amit Deshmukh ) , आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करुया

आरोग्याच्या दृष्टीने सवयी बदलायला हव्यात- उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की जगभरात ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. आपली पृथ्वी, आपले आरोग्य म्हणून आजचा दिवस साजरा करण्यात येत आहे. आरोग्याच्याबाबत आदींच्या पिढीने फारसे लक्ष दिले नाही. महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. कोरोना काळात त्याचे महत्त्व जाणवले. मंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम करून महामारी आटोक्यात आणली. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. सध्या लोकांचे राहणीमान बदलेले आहे. वेगवेगळ्या सवयी लागल्या आहेत. परिणामी विविध व्याधी जडत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने सवयी बदलायला हव्यात. तसेच मास्क ऐच्छिक असला तरी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

आपल्याच चुकांमुळे नैसर्गिक संकटे - सध्या खेळण्यासाठी मैदाने नाहीत. मोकळ्या जागांचा अभाव आहे. शारीरिक व्यायाम, कवायत करता येत नाही. मात्र शारीरिक हालचाली होणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम व्हायला हवा. चिंता मुक्त राहायला हवे. तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगत आरोग्य बाबत जनजागृती करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन केले. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढला आहे. नैसर्गिक संकटे मागोमाग येत असून आपल्याच चुकांमुळे ती उभी राहीली आहेत. धोका कमी करण्यासाठी वसुंधरेचा विचार करून प्रयत्न करायला हवेत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

फिट महाराष्ट्र संकल्प करु या - मोठ्या उत्साहात आपण एकत्र येऊन जागतिक आरोग्य दिन साजरा करतो आहे. आपल्याला फिट महाराष्ट्राचा संकल्प करायचा आहे. त्यासाठी बी फिट, बी हेल्दी आणि सेव्ह लाइफ या मोहिमेला आपण सुरुवात करत आहोत, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या पर्यावरणात झालेल्या वातावरणाच्या बदलामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी आपण फिट राहायला हवे, असे टोपे म्हणाले.

हेही वाचा-Nana Patole : ..तर मोदी सरकार जगातील सर्वात शक्तिशाली सरकार बनू शकेल : नाना पटोले

हेही वाचा-Fit Maharashtra : नियमित व्यायाम करा, तरच निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा-Sanjay Raut on Azaan loudspeaker : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून अजानच्या लाऊड स्पीकरबाबत नोटीस- संजय राऊत यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.