ETV Bharat / city

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही! नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अजित पवारांचा टोला - Chief Minister Uddhav Thackeray

पाच वर्षे सत्तेत नसताना संकट आल्यावर आम्हीही अशा अडचणीच्या लोकांना भेटण्यासाठी जात होतो. त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाहीत, प्रांत अधिकारी कुठे गेले, मामलेदार कुठे आहेत? असे कधीही म्हटले नाही. तसेच, याबाबत काही विचारलेही नाही. अरे तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करण्यासाठी आलात असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी भाजपसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुणावले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Jul 29, 2021, 5:27 PM IST

मुंबई - नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल 'अरे-तुरे'चे शब्द वापरले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुणावले आहे. मुख्यमंत्री एखाद्या घटनेची पाहणी करण्यासाठी जातात, त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात. मग कुणीही मुख्यमंत्री असेल, तर तसेच होणार. नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात, असा मोलाचा सल्लाही अजित पवार यांनी भाजपला यावेळी दिला आहे.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही! नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अजित पवारांचा टोला

'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही'

पाच वर्षे सत्तेत नसताना संकट आल्यावर आम्हीही अशा अडचणीच्या लोकांना भेटण्यासाठी जात होतो. त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाहीत, प्रांत अधिकारी कुठे गेले, मामलेदार कुठे आहेत? असे कधीही म्हटले नाही. तसेच, याबाबत काही विचारलेही नाही. अरे तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करण्यासाठी आलात असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला आहे.

'मागच्या काळात कोणत्याही मुख्यमंत्र्याने किंवा इतर नेत्याने असे उद्गाऱ काढले नाहीत'

यशवंत चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली, तेव्हापासून मोठ-मोठे लोक राज्याचे प्रमुख झाले. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला, तर कधीही अशापध्दतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार कुणीही काढलेले नाहीत. तसेच, त्याकाळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनीही असे उद्गार काढले नव्हते, याची आठवणही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला करुन दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.