मुंबई राज्यातील लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायींमुळे (conch snails) शेतीचे अतोनात नुकसान (damage of agriculture) झाल्याने शासनाने तातडीने उपाय योजना करत ९८ कोटी ५८ लाख रूपयांच्या मदतीस मंजूरी दिली आहे. केंद्र शासनाने जाहिर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये पेस्ट अटॅक (Pest attack) म्हणजे किटकांचा हल्लाही अंतर्भूत आहे. त्यानुसार गोगलगायींचा उपद्रव हा पेस्ट अटॅक असल्याने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाने घेतला. अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी दिली. निधी वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्यासंदर्भात जीआर (GR on pest attack) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.
दुप्पट दराने मदत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील एनडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करून दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच निर्णयाच्या अनुषंगाने गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात वाढीव दर निर्धारित करण्यात आले आहेत. तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख १८ हजार ९९६ शेतकऱ्यांना या योजनेतून मदत मिळणार आहे. गोगलगायींमुळे एकूण ७२ हजार ४९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
पारदर्शक पंचनामे - सत्तार मदत वाटपात संपूर्ण पारदर्शता बाळगण्यासाठी पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत लाभार्थ्यांना थेट ऑनलाइन पद्धतीने हस्तांतरित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासंदर्भात ही सूचना देण्यात आल्या आहेत.
दररोज आढावा घेणार गोगलगायींमुळे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिके/फळपिकांच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरपर्यंतही नुकसानभरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईच्या या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपण स्वतः लक्ष ठेवून असून होत असलेल्या मदतकार्याचा दररोज आढावा घेतला जाईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगतिले.