ETV Bharat / city

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा २३७ किमीच्या मार्गासाठी NHSRCL व IRCON मध्ये करार - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ट्रॅक पॅकेज टी-२ साठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने (एनएचएसआरसीएल) आणि आयआरसीओएन इंटरनॅशनल लि. यांच्यामध्ये करार झाला आहे. आज एनएचएसआरसीएलने आयोजित केलेल्या या सोहळ्यात हा करार झाला.

bullet train
bullet train
author img

By

Published : Jan 21, 2022, 8:58 PM IST

मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ट्रॅक पॅकेज टी-२ साठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशने (एनएचएसआरसीएल) आणि आयआरसीओएन इंटरनॅशनल लि. यांच्यामध्ये करार झाला आहे. आज एनएचएसआरसीएलने आयोजित केलेल्या या सोहळ्यात हा करार झाला. यावेळी जपानच्या दूतावासाचे मंत्री मियामोटो शिंगो आणि जायका इंडियाचे चीफ रिप्रेझेंटेटिव्ह साइतो मिन्सुनोरी यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली.

५०८ किमीचा ट्रॅक टाकणार -
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या एमएएचएसआर प्रकल्पाअंतर्गत हा पहिलाच करार आहे. या टी-२ पॅकेजमध्ये एमएएचएसआर प्रकल्पातील जवळपास ४७ टक्के अंतर (५०८ किमी) म्हणजेच महाराष्ट्र-गुजरात सीमेपासून गुजरातमधील वडोदरापर्यंतचा पल्ला समाविष्ट आहे. या पॅकेजमध्ये ट्रॅक आणि ट्रॅकशी संबंधित कामाचे डिझाइन, पुरवठा आणि बांधकामासोबतच चाचण्या आणि प्रकल्प कार्यान्वित करणे (टेस्टिंग आणि कमिशनिंग) अशा बाबींचाही समावेश असणार आहे. जपान रेल्वे ट्रॅक कन्सलटंट्स (जेआरटीसी) आणि जपान रेल्वे टेक्निकल सर्विस (जेएआरटीएस) अशा दोन जपानी एजन्सीस टी-२चे काँण्ट्रॅक्टर आयआरसीओएन इंटरनॅशनल लि. यांच्यासोबत काम करतील. जपान रेल्वे ट्रॅक कन्सलटंट्स (जेआरटीसी) ट्रॅक डिझाइनच्या कामासाठी नॉमिनेटेड सब काँण्ट्रॅक्टर म्हणून काम पाहतील. तर जपान रेल्वे टेक्निकल सर्विस (जेएआरटीएस) भारतात ट्रेनिंग अॅण्ड सर्टिफिकेशन आणि अॅडव्हायझरी सेवा देण्यासाठी जपानच्या शिंकान्सेनच्या बांधकाम क्षेत्रातील व्यापक अनुभव आणि तज्ज्ञता असलेल्या जपानी तज्ज्ञांशी समन्वय साधून त्यांना एकत्र आणतील.

जपान-भारत संबंधांचे प्रतिक -
भारतातील जपानी दूतावासातील मंत्री मियामोटो शिंगो म्हणाले, “एमएएचएसआर प्रकल्प म्हणजे जपान-भारत संबंधांचे प्रतिक आहे. भारतातील पहिल्या हाय स्पीड रेल प्रकल्पात जपानचे हाय स्पीड रेल तंत्रज्ञान सादर करून हे संबंध अधिक दृढ होतील. एमएएचएसआर ट्रॅक पॅकेजेसमध्ये भारतीय कॉण्ट्रॅक्टर्सना जपानी एजन्सीजकडून तंत्रज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जपान आणि भारत नेहमीच असे खांद्याला खांदा लावून पुढे जातील. या जपान-भारत सहकार्यातून जपानच्या हाय स्पीड रेल प्रणालीतून तंत्रज्ञान भारतात येण्याची खातरजमा होईलच. शिवाय, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेलाही बळकटी मिळेल.

१८ हजार कोटी रुपयांचे कर्ज -
२०१७ सालापासून एकूण २५०,००० दशलक्ष जपानी येन (सुमारे १८,००० कोटी रु.) चे (ओडीए) अधिकृत विकास कर्ज पुरवून जायका मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पाला साह्य करत आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड रेल्वे सुरू करून अधिक वेगवान सार्वजनिक दळणवळण यंत्रणा उभारणे, हा यामागचा उद्देश आहे. यात जपानच्या शिंकान्सेन तंत्रज्ञानाचा (बुलेट ट्रेन नावाने प्रचलित) वापर केला जाणार आहे. त्यामुळे भारतातील दळणवळण सेवा अधिक वृद्धिंगत होतील आणि या भागाच्या आर्थिक विकासात भर पडेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.