ETV Bharat / city

'वाडिया'ला जीवनदान द्या; कर्मचारी आणि कामगार युनियनचे रुग्णालयाबाहेर धरणे

मुंबईतील सर्वात जुने नौरोसजी वाडिया रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने जितके अनुदान द्यायला हवे, तितके अनुदान सध्या रूग्णालयाला मिळण्यास विलंब होत आहे.

agitation of workers and unions outside Wadia Hospital
वाडीया रुग्णालयाबाहेर कर्मचारी आणि कामगार युनियनचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Jan 13, 2020, 1:50 PM IST

मुंबई - शहरातील सर्वात जुने नौरोसजी वाडिया रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने जितके अनुदान द्यायला हवे, तितके अनुदान सध्या रुग्णालयाला मिळण्यास विलंब होत आहे. यामुळेच हे रुग्णालय बंद होऊ नये, यासाठी वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तसेच कामगार एकत्र येत रुग्णालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

वाडीया रुग्णालयाबाहेर कर्मचारी आणि कामगार युनियनचे धरणे आंदोलन

हेही वाचा... आव्हाड म्हणतात ते दोघेच एकमेकांचे शनि; तर शनिदेवालाच 'यांचा' शनि लागायचा बच्चू कडूंचा टोला

या रुग्णालयात गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हे रुग्णालय वाचले पाहिजे असे सांगितले आहे. 'महापालिका व राज्य शासन वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर काहीही आक्षेप घेत अनुदान रोखून धरत आहे. तसेच त्याबद्दल शासनाने एक समिती नेमली आहे. त्यालाही जास्तीचा कालावधी लोटला असून मुंबईतील गरीब कामगार, कष्टकरी जनतेच्या रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे. या रुग्णालयात साधारणतः दररोज 50 ते 60 रुग्ण येतात. त्यांच्यावर येथे चांगल्या प्रकारचे उपचार केले जातात. त्यामुळे सरकारने या रुग्णालयाला लवकरात लवकर अनुदान द्यावे, तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वेतन द्यावे', अशी मागणी येथील आंदोलक करत आहेत.

हेही वाचा...'त्या' पुस्तकावर तत्काळ बंदी घाला; अन्यथा....., संभाजी ब्रिगेडचा इशारा

वेतन, पेन्शन आणि अनुदान या प्रश्‍नावर नौरोसजी वाडिया रुग्णालयाचे कामगार आणि कर्मचारी यांच्या लालबावटा जनरल कामगार युनियनने रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. महापालिका व राज्य शासन यांनी अनुदान दिले नाही, हे कारण सांगून वाडिया व्यवस्थापनने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही. तसेच निवृत्त कामगारांचे पेन्शन बंद केले आहे. युनियनने प्रशासनाच्या या कृत्याचा तीव्र विरोध केला असून रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला आहे. युनियनने ज्या मागण्या केलेल्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी लालबावटा युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांनी केली आहे.

हेही वाचा... महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कार दरीत कोसळली; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

महाराष्ट्र शासनाने वाडिया रुग्णालयाच्या अनुदानाची थकीत बाकी लवकरात लवकर द्यावी. नौरोसजी वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी सुमारे दहा कोटी दहा लाख इतकी असून ती देखील त्वरित देण्यात यावी. आदी मागण्यांसाठी लालबावटा युनियन तसेच इतर कामगारांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. कामगारांच्या या आंदोलनाला प्रशासन कशा प्रकारे हाताळणार आणि सरकार वाडिया रुग्णालयाला जीवनदान देणार का? हे आता पाहावे लागेल.

Intro:मुंबईतील सर्वात जुना नव्वद वर्ष अगोदरच नवरोजी वाडिया मल्टी रुग्णालय हे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे कारण पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने अनुदान द्यायला हव आहे ते अनुदान मिळण्यास विलंब होतो त्यामुळे आता हे रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि यासाठीच आज या वाड्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तसेच कामगार येऊन यांनी वाड्या रुग्णालया समोर विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन केले आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी

Body:वेतन पेन्शन ग्रँड या प्रश्‍नावर नवरोजी वाडिया मल्टी रुग्णालयाचे कामगार आणि कर्मचारी नर्सेस लालबावटा जनरल कामगार युनियन यांनी हॉस्पिटल समोर धरणे आंदोलन करत महापालिका व राज्य शासन यांनी ग्रँड दिली नाही हे कारण सांगून वाडी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नाही तसेच निवृत्ती कामगारांचे पेन्शन बंद केले आहे तर आता पेशंटही देणे बंद केले आहे या कृत्याला युनियनच्या वतीने तीव्र विरोध करत प्रशासन हे रुग्णालय खाजगीकरण करत आहे असा आरोप करत ज्या मागण्या गेलेले आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी लालबावटा युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांनी सांगितले

Conclusion:गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की महापालिका व राज्य शासन या वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर काहीही आक्षेप घेऊन ग्रांड रोखून धरत आहे तसेच त्याबद्दल शासनाने एक समिती नेमली आहे याला जास्त कालावधी तसेच अनेक महिने जात असून मुंबईतील गरीब कामगार कष्टकरी जनतेच्या रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे दिवसाला या रुग्णालयात 50 ते 60 रुग्ण येतात त्यांच्यावर येथे मोठ्या प्रमाणात चांगली ट्रीटमेंट होते त्यामुळे सरकारने हे रुग्णालय लवकरात लवकर अनुदान द्यावे तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित वेतन द्यावे अशी मागणी करत हे आंदोलन केले आहे

महाराष्ट्र शासनाने वाड्या रुग्णालयाची 110 अनुदानाची थकीत बाबतीत त्वरित द्यावी नवरोजी वाडिया कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दहा कोटी दहा लाख एवढी असून ती त्वरित द्यावी नवरोजी वाडिया रुग्णालयाला सातवे वेतन जानेवारी 2019 पासून लागू करावे वेतन पेन्शन ग्रँड चालू राहिली पाहिजे या आदी मागण्यांसाठी लालबावटा तसेच या कामगारांनी आज धरणे आंदोलन केले आता कामगारांच्या संविधानिक धरणे आंदोलनाला प्रशासन कशा प्रकारची जात देतो तसेच वाडिया रुग्णालयाला जीवनदान हे सरकार देतं का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.