ETV Bharat / city

Sanjay Rathod: यानंतर असेच आरोप होत राहीले तर कायदेशीर पाऊल उचलणार -संजय राठोड - चित्रा वाघ यांचा संजय राठोड यांच्यावर आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते, महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. मी निष्कलंक असून आतापर्यंत शांत होतो. यापुढे अशाच प्रकार सुरू राहिल्यास कायदेशीर नोटीस बजावणार असा अप्रत्यक्ष इशारा चित्रा वाघ यांना दिला आहे.

संजय राठोड
संजय राठोड
author img

By

Published : Aug 10, 2022, 7:42 PM IST

मुंबई - संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच, विविध स्तरावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर या टीकेवर संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.

माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करायचा प्रयत्न झाला - मी निष्कलंक निःपक्षपाती चौकशीसाठी मी स्वतः राजीनामा दिला. आता पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे। जेव्हा आरोप झाले तेव्हा मानसिक तणावात होतो. गेली ३० वर्षे राजकीय, सामाजिक जीवनात वावरतोय. मात्र, माझं राजकीय आयुष्य उध्वस्त करायचा प्रयत्न झाला. या आरोपामुळे बाजूला होतो. आता पोलिसांनी राजपत्र प्रकाशित केले आहे. त्यामुळे निष्कलंक असून शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेतल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

कायदेशीर नोटीस बजावणार - न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर विश्वास आहे. आई वडील, पत्नी मुलं आहेत. सर्वांना मानसिक स्थितीतून जावे लागले. या गोष्टीमध्ये तथ्य असते तर निवडून आलो असतो का? असा सवाल उपस्थित केला. तसेच, भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्याने आरोप करत आहेत. आपल्यावर अशाप्रकारे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एवढ्या दिवसांपासून आम्ही गप्प होतो. पण यापुढे कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असे संकेत राठोडांनी दिले. कोणताही (FRI) नाही तरी आरोप झाले. मात्र, चौकशीसाठी दबाव कधीही टाकला नाही. मागासवर्गीय कुटुंबातून आल्याने मला बदनाम करण्याचा घाट घातला जातो आहे. राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली असून महाराष्ट्रात चांगले काम करेन, असे राठोड म्हणाले आहेत.

हेही वाचा - डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.