ETV Bharat / city

हरिहरेश्वर येथे संशयित बोटी; तटकरेंची विधान परिषदेत चौकशीची मागणी - विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे संशयित बोटी, एके ४७ च्या तीन रायफल आणि लाईफ गार्ड सापडले आहे. Suspicious boats at Harihareshwar राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 18, 2022, 3:44 PM IST

Updated : Aug 18, 2022, 8:26 PM IST

मुंबई - रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे दुपारी तीन संशयित बोट सापडल्या असून त्यात तीन एके ४७ रायफल, लाईफ गार्ड मिळाले आहेत. उद्या दहीहंडीचा उत्सव आहे त्यामुळे काही घातपात होण्याची शक्यता आहे का आतंकवादी आलेत का याचा तपास करावा, Member of Legislative Council Aniket Tatkare अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य अनिकेत तटकरे यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी केली.

आदिती तटकरे माध्यमांशी बोलताना

गृहमंत्र्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मागणीला समर्थन देत, मुंबईत समुद्रमार्गे आतंकवादी हल्ला झाला होता. उद्या गोकुळाष्टमी सण आहे. त्यामुळे हा प्रकरण गंभीर असून रायगड हरिहरेश्वर मधील प्रकार त्या स्वरूपाचा आहे का, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. दरम्यान, गृहमंत्र्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, तशा सूचना देण्यात येतील असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हरिहरेश्वर येथे संशयित बोटी

प्रशासनाकडून हायअलर्ट जारी मिळालेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वर किनाऱ्यावरती ही बोट संशयास्पद स्थितीमध्ये समुद्रात होती. त्यानंतर तेथील नागरिकांच्या सहाय्याने ती बोट समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आली. या बोटीत शस्त्रास्त्र सापडल्याने, काही घातपाताचा कट होता का?, असा सवाल उपस्थित होतं आहे. दरम्यान, या बोटीमध्ये कोणी चालक अथवा अन्य कोणीही दिसले नाही. दरम्यान, या घटनेमुळे रायगड जिल्हात पोलीस प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

हरिहरेश्वर येथे संशयित बोटी प्रकरण
हरिहरेश्वर येथे संशयित बोटी प्रकरण

स्पेशल टीम नियुक्त करण्याची मागणी याप्रकरणी बोलताना श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी सांगितलं की, रायगडमधील श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर मध्ये शस्त्रे आणि कागदपत्रे असलेली एक बोट आढळली आहे. स्थानिक पोलीस तपास करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांना तातडीने या बोटीच्या चौकशीसाठी एटीएस अथवा राज्य पोलीस दलाची स्पेशल टीम नियुक्त करण्याची मागणी केली आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

हरिहरेश्वर येथे संशयित बोटी प्रकरण
हरिहरेश्वर येथे संशयित बोटी प्रकरण

हेही वाचा - MH Monsoon Session 2022 पंन्नास खोके...एकदम ओके, विरोधकांची घोषणाबाजी

Last Updated : Aug 18, 2022, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.