कोल्हापूर /अमरावती /मुंबई : राज्याने पेट्रोल डिझेल दर कपातीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की. "इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के! इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'!"
-
इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!
इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा.
पण नाही!
याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'! https://t.co/UTPQTPNhoB
">इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2022
देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!
इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा.
पण नाही!
याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'! https://t.co/UTPQTPNhoBइंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2022
देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!
इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा.
पण नाही!
याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे'! https://t.co/UTPQTPNhoB
केंद्र सरकारने इंधनाचे दरकपात ( Central government cuts fuel prices ) केल्यानंतर राज्य सरकारनेही दर कमी करावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून आता होताना पाहायला मिळत आहे. मात्र केंद्र सरकारने पहिले पन्नास रुपयाचा दर वाढवायचा आणि नंतर पाच रुपये कमी करायचे असे धोरण आखले असल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Minister Satej patil ) यांनी केली. केंद्राप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी हे ज्याप्रमाणे कळतं, त्याचप्रमाणे माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी याची जाणीव त्यांना व्हावी आणि पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांवर राज्य सरकारच्या वतीने सूट द्यावी, असे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी म्हटले आहे. तसेच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. कारण त्यांना जनतेची काळजी आहे. परंतु महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हॅट कमी करत नाहीत, कारण त्यांना जनतेची चिंता नाही तर त्यांच्या घोटाळेबाज मंत्र्यांची चिंता आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी दिली आहे.
'गुजरातच्या निवडणुका लवकर लावण्याच्या प्रयत्न' : केंद्र सरकारने काल इंधनावरील अबकारी कर कमी करत इंधनाच्या दरात ( Fuel Rate Reduction ) कपात केली. यानंतर राज्य सरकारनेही पुढाकार घेऊन इंधन दरात आणखी कपात करावी अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. मात्र केंद्र सरकारने पहिले पन्नास रुपयाचा दर वाढवायचा आणि नंतर पाच रुपये कमी करायचे असे धोरण आखले असल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. तसेच अबकारी करात राज्य सरकारचा 50 टक्के वाटा आहे. यामुळे केंद्र सरकारने यापेक्षा ही आणखी दर कमी करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून दरवाढ कमी करा, अशी लोकांची मागणी होत असताना आत्ताच ही दर कपात केली गेली. यावरून केंद्र सरकारला गुजरातची निवडणूक लवकर लावायचे का? अशी शंका कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ( Kolhapur Guardian Minister Satej Patil ) यांनी व्यक्त केली आहे.
'केंद्र सरकारकडून मोठी सूट, आता उद्धव ठाकरेंची जबाबदारी' : केंद्र सरकारने सात महिन्यात दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलिंडरच्याचे दर कमी केले आहेत. पेट्रोलचे दर साडेनऊ रुपयांनी, डिझेलचे दर आठ रुपयांनी तर उज्वला योजने अंतर्गतच्या गॅस सिलिंडरचे दर दोनशे रुपयांनी कमी करण्यात आले आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी हे ज्याप्रमाणे कळतं, त्याचप्रमाणे माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी याची जाणीव त्यांना व्हावी आणि पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांवर राज्य सरकारच्या वतीने सूट द्यावी, असे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी म्हटले आहे.
'...तर उद्धव ठाकरेंनी दुहेरी भेट दिली असती' : जोपर्यंत जनतेचे रक्त आणि घाम गाळून राज्य सरकार तिजोरी भरत नाही, तोपर्यंत त्यांचे भ्रष्ट मंत्री पैसे कुठून कमवणार? जर उद्धव ठाकरेंना मुंबईतील जनतेबद्दल थोडाही जिव्हाळा असता, तर सोशल मीडियावर ज्ञानाचा प्रसार करण्याऐवजी त्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करून जनतेला दुहेरी भेट दिली असती. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेद्वारे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला राज्य सरकारने इंधनावरील कर 24 तासांत कमी करावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, अशी हाक भाजपा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना ( BJP Mumbai president Tejinder Singh Tiwana ) यांनी दिली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटबाबत 12 पत्रकार परिषदांचे आयोजन : मुंबईकरांच्या हितासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या मागणीच्या संदर्भात आज 12 पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ज्यांची घरं काचेची आहेत, त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये, अशा उद्धव ठाकरेंच्या कालच्या वक्तव्यावर तिवाणा यांनी टोला लगावला. पवार साहेब आणि सोनिया गांधी सांगतात तेच ठाकरे करतात असे ते म्हणाले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. कारण त्यांना जनतेची काळजी आहे. परंतु महाराष्ट्रात मुख्यमंत्री व्हॅट कमी करत नाहीत, कारण त्यांना जनतेची चिंता नाही तर त्यांच्या घोटाळेबाज मंत्र्यांची चिंता आहे.
हेही वाचा - Opponents Criticized Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेनंतर विरोधकांचेही टीकास्त्र; वाचा, कोण काय म्हणालं!