ETV Bharat / city

Silver Oak Attack Case : सदावर्तेंच्या अटकेनंतर आता जयश्री पाटील नॉटरिचेबल.. पोलिसांकडून शोध सुरु

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरणात ( Silver Oak Attack Case ) अटक करण्यात आल्यानंतर ( Guntaratna Sadavarte Arrested ) आता त्यांच्या पत्नी असलेल्या जयश्री पाटील यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांचे संरक्षण सोडले ( Jayashree Patil leaves Mumbai Police protection ) असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत ( Police Search To Find Jayashree Patil ) आहे.

जयश्री पाटील
जयश्री पाटील
author img

By

Published : Apr 15, 2022, 4:57 PM IST

मुंबई- वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेले पोलीस संरक्षण गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील- सदावर्ते यांनी सोडले ( Jayashree Patil leaves Mumbai Police protection ) आहे. मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ( Silver Oak Attack Case ) एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना 8 एप्रिल रोजी अटक केली ( Guntaratna Sadavarte Arrested ) होती. सध्या गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कोठडी आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हल्ला प्रकरणात जयश्री पाटील यादेखील आरोपी असून, सध्या त्या पसार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सदावर्ते यांना 8 एप्रिलला अटक केल्यानंतर 9 एप्रिल रोजी जयश्री पाटील यांनी राज्य सरकारने दिलेले संरक्षण सोडले आहे.

दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना पसार दाखवण्यात आले ( Police Search To Find Jayashree Patil ) आहे. हे आंदोलन करण्यास जयश्री पाटील यांनीच सांगितल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.

बुधवारी (13 एप्रिल) संध्याकाळी एफआयआरमध्ये गावदेवी पोलिसांनी त्यांचे नाव आरोपी म्हणून जोडल्यानंतर जयश्री पाटील यांनी आपला मोबाईल फोन बंद केला असून, त्या नॉटरिचेबल आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आधीच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्यानंतर आता त्यांची पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यासुद्धा अडचणीत आल्या आहेत.

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर आणि आरक्षणाविरोधात कोर्टात बाजू मांडत असल्याने त्यांच्या जीवाला मराठा समाजाकडून धोका असल्याचे अनेकदा सदावर्ते यांनी म्हटले होते. तसेच त्यांच्यावर एकदा हल्ला झाल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण दिले होते. मात्र जयश्री पाटील यांनी हे संरक्षण सोडले आहे.

हेही वाचा : कट रचून गुणरत्न सदावर्ते यांना फसवण्याचा प्रयत्न - जयश्री पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.