ETV Bharat / city

BMC Nalasfai Issue : आयुक्तांच्या आदेशानंतरही नालेसफाई संथ गतीने; केवळ 27 टक्केच काम पूर्ण - 27 टक्के नालेसफाईचे काम मुंबई

पालिका आयुक्तांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50 टक्के नालेसफाई ( BMC Nalasafai Issue ) होईल, असा दावा केला होता. मात्र 1 मे रोजी केवळ 27 टक्केच नालेसफाई झाल्याचे समोर आले आहे. दोन शिफ्टमध्ये काम, दुप्पट मशिनरी लावण्याच्या आदेशानंतरही काम संथ गतीने सुरू असल्याने पालिका आयुक्तांचा ( Claim of Municipal Commissioner ) दावा फोल ठरल्या पाहायला मिळत आहे.

Nalasfai file photo
Nalasfai file photo
author img

By

Published : May 1, 2022, 4:53 PM IST

Updated : May 2, 2022, 9:30 PM IST

मुंबई - मुंबईत दरवर्षी कमी वेळात जास्त पाऊस पडतो. पावसाचे पाणी साचून मुंबई ठप्प होते. यासाठी पालिकेकडून कंत्राटदारांच्या मदतीने नालेसफाई केली जाते. पालिका आयुक्तांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50 टक्के नालेसफाई ( BMC Nalasafai Issue ) होईल, असा दावा केला होता. मात्र 1 मे रोजी केवळ 27 टक्केच नालेसफाई झाल्याचे समोर आले आहे. दोन शिफ्टमध्ये काम, दुप्पट मशिनरी लावण्याच्या आदेशानंतरही काम संथ गतीने सुरू असल्याने पालिका आयुक्तांचा ( Claim of Municipal Commissioner ) दावा फोल ठरल्या पाहायला मिळत आहे.

अशी झालीय नालेसफाई : मुंबईत 3 वेळा नालेसफाई केली जाते. पावसाळ्यापूर्वी 75 टक्के, पावसाळा सुरू झाल्यावर 15 टक्के तर पावसाळा संपल्यावर 10 टक्के अशी नालेसफाई केली जात आहे. मुंबईत 2 लाख 89 हजार 699 मीटर लांबीचे 302 नाले आहेत. यामधून 9 लाख 7 हजार 160 मॅट्रिक टन गाळ काढायचा असून त्यापैकी 1 मे पर्यंत 3 लाख 80 हजार 286 मॅट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. 1 मे पर्यंत शहर विभागात 15 टक्के, पूर्व उपनगरात 38 टक्के तर पश्चिम उपनगरात 30 टक्के, मिठी नदी 79 टक्के तर छोटे नाले 30 टक्के साफ झाले आहेत. आजपर्यंत एकूण 27.66 टक्के नालेसफाई करण्यात आली आहे तर छोटे नाले धरून 28.25 टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

काय आहेत आयुक्तांचे आदेश? : मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आल्याने नालेसफाईच्या कामाचे प्रस्ताव मंजूर झाले नव्हते. हे प्रस्ताव प्रशासक असलेल्या महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी उशिरा मंजूर केले. 5 एप्रिल रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यामुळे यंदा नालेसफाई 15 दिवस उशिरा सुरुवात झाली. आतापर्यंत सुमारे 27 टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत 50 टक्के तर 31 मे पूर्वी 75 टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिले आहेत. नालेसफाई लवकर पूर्ण करता यावी यासाठी दोन शिफ्टमध्ये काम व मशिनरी दुप्पट करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. मात्र त्यानंतरही मे महिना सुरू झाला तरी अवघी 27 टक्के नालेसफाई झाली आहे. यामुळे 31 मे पर्यंत नालेसफाई 100 टक्के पूर्ण होणार का याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दावे वरवरचे : नालेसफाई झाल्याचा दावा केला जात असला तरी पालिकेचे हे दावे वरवरचे आहेत. बहुतेक नाले गाळाने अजुनही तुंबलेले आहेत. पाऊस तोंडावर आला असताना नाले सफाईचा गाळ कसा उचलणार, तो गाळ वेळेवर उचलला जाईल का असा प्रश्न माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. नालेसफाईच्या कामाचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा - Subhash Desai on Raj Thackeray : आधी कमळासोबत भुंग्याचे आता भोंग्याचे नात आहे - सुभाष देसाई

Last Updated : May 2, 2022, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.