मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) अखेर आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) हे देखील आयोगासमोर आलेले होते. परमवीर सिंग यांची चौकशी झाल्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia bomb scare Probe) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील (Mansukh Hiren Death) मुख्य आरोपी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यात आज बंद दाराआड तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यातील तासभर चर्चेत, त्यांचे वकील देखील उपस्थित होते. एका आरोपीला अशाप्रकारे दुसरे आरोपीची कसं काय भेटता येते यावर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यातील एक आरोपी आहे. असे असताना दोघांमध्ये चर्चा कशी झाली असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी वाझे आणि सिंह यांची भेट आणि चर्चेवर आक्षेप घेतला. त्यावर चांदीवाल आयोगाने ही भेट कोर्टाबाहेर झाली, असल्याने त्यामुळे आपण त्यावर काही करू शकत नसल्याचे म्हटले आहे.
दोघांमध्ये तासभर चर्चा
सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपास पोलिस करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
हेही वाचा - Param Bir Singh : परमबीर सिंग यांचा प्रतिज्ञापत्रात मोठा गौप्यस्फोट