ETV Bharat / city

Shiv Sena Symbol Issue: दसरा मेळाव्यानंतर दोन्ही गटाची धावपळ, पोटनिवडणूकीआधी लढाई धनुष्यबाणासाठी - अंधेरी पोटनिवडणूक

Shiv Sena Symbol Issue: दसरा मेळावा (dasara melava) संपल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईसाठी धावपळ उडाली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या (Andheri By election) आधीच निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

Shivsena election symbol
Shivsena election symbol
author img

By

Published : Oct 6, 2022, 5:26 PM IST

Updated : Oct 6, 2022, 9:17 PM IST

मुंबई: Shiv Sena Symbol Issue: शिवसेना कोणाची हा वाद (thackeray vs shinde) आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात असून कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा संपल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि शिंदे (eknath shinde) गटाची धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईसाठी धावपळ उडाली आहे.

उद्या मुदत संपणार: मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची धामधूम सुरु असताना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाचं हे प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टात प्रलंबित आहे. यासंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार ती मुदत उद्या संपणार आहे. दोन्ही गट आजच कागदपत्रे घेऊन दिल्लीत रवाना झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज वकिलांची भेट घेण्यात आली. या बैठकीत निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायचे, आणखी कोणत्या प्रकारचे पुरावे सादर केले पाहिजेत याबाबत खल होऊ शकतो. तसेच या सगळ्या कायदेशीर लढाईसाठी आणखी काही अवधी देण्यात यावा अशी चर्चा देखील करण्यात आली.

पोटनिवडणूकीआधी निर्णय? : येत्या ३ नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेईल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे.

निकालाचा निवडणूकीवर परिणाम: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, याचा फैसला झाल्यास अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

Last Updated : Oct 6, 2022, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.