ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : शिक्षण विभागासमोर विविध विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयीन परीक्षांचा मेळ घालण्याचे आव्हान - uday samant

राज्यात विद्यापीठांसाठी एकच कायदा असला तरी परीक्षांबाबत मात्र तो कायदा पाळण्यासाठी सर्व विद्यापीठांनी पळवाटा शोधल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट टळल्यानंतर देखील या सर्व विद्यापीठांमध्ये एकाच काळात परीक्षा घेण्याचे आणि निकाल लावण्याचे आव्हान असणार आहे.

education department also faces challenge of taking examination of all the universities and colleges in Maharashtra
शिक्षण विभागासामोर विविध विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयीन परीक्षांचा मेळ घालण्याचे आव्हान
author img

By

Published : Apr 10, 2020, 8:15 PM IST

Updated : Apr 10, 2020, 10:26 PM IST

मुंबई - राज्यात विद्यापीठांसाठी एकच कायदा असला तरी परीक्षांबाबत मात्र तो कायदा पाळण्यासाठी सर्व विद्यापीठांनी पळवाटा शोधल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट टळल्यानंतर देखील या सर्व विद्यापीठांमध्ये एकाच काळात परीक्षा घेण्याचे आणि निकाल लावण्याचे आव्हान असणार आहे. मात्र, आजपर्यंतचा इतिहास पाहता हे नियोजन बिघडण्याची शक्यता अधिक आहे. उच्च शिक्षण विभागच याबाबत मोठ्या संभ्रमावस्थेत सापडला असून विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील परीक्षांचा मेळ कसा घालायचा, हे मोठे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे. परिणामी विद्यार्थ्यांची चिंता वाढण्याची शक्यता देखील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

सिद्धार्थ इंगळे, महाराष्ट्र स्टुडंट युनियन

हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम

विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या परिक्षांचा मेळ घाण्यासाठी शिक्षण विभागकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना तरिही...

विशाल गांगुर्डे, पुरोगामी विद्यार्थी संघटना

राज्यातील विविध विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील परीक्षा या साधारण मार्च-एप्रिलमध्ये सुरू होतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट राज्यापुढे उभे आहे. त्या कारणास्तव या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात महत्वाची बाब म्हणजे राज्यातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालय यांच्या द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा हिशोब राज्यात कुठेही एकसारखा असल्याचे दिसत नाही. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा कशा घ्याव्यात, यासाठी शिक्षण विभागाने चार कुलगुरू आणि दोन संचालकांची एक समिती काही दिवसांपूर्वीच स्थापन केली आहे. मात्र, नेमणुक झाली असली तरी अद्याप या समितीचा थांगपत्ता नसल्याने एकंदरीत परीक्षांच्या नियोजनाविषयी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

अमोल मातेले, अध्यक्ष (राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस)

एकट्या मुंबई विद्यापीठात मानव्य विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांच्या मिळून ७५९ परीक्षा घेतल्या जातात. याहून थोडी अधिक संख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आहे. उर्वरित विद्यापीठांमध्येही लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई विद्यापीठाकडून कला, वाणिज्य, विज्ञानसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सेमिस्टर एक आणि सेमिस्टर पाच व सहाच्या परीक्षा घेतल्या जातात. उर्वरित सर्व‍ सेमिस्टरच्या परीक्षा संबंधित महाविद्यालयांकडून घेतल्या जातात. तर काही विद्यापीठांमध्ये एक ते चार सेमिस्टर तर काही विद्यापीठे ही सर्वच परीक्षा घेतात. एकाही विद्यापीठाचा दुसऱ्या विद्यापीठांशी परीक्षेच्या संबंधात ताळमेळ नाही. यामुळे सरकारने नेमलेली समिती काय ठरविते याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

विविध संघटना आणि जाणकारांकडून सरकारला दिले मोलाचे सल्ले...

राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र स्टुडंट युनियन आदी विद्यार्थी संघटनांनी उन्हाळी परीक्षा या जुलै, सप्टेंबर या महिन्यांत घेण्यासाठी अनेक पर्याय सरकारपुढे दिले आहेत. शिक्षण विभागाने त्या सगळ्याचा विचार करावा, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना आणि जाणकारांनी केले आहे.

examinations postponed of universities in Maharashtra
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील परीक्षा पुढे ठकलल्या...

अभ्यासक्रम पूर्ण त्यामुळे परीक्षा कधीही घ्या !

राज्यातील सर्वच विद्यापीठांतील उन्हाळी सुट्टयांसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर या परीक्षा कधीही घ्याव्यात. त्यासाठी आम्ही देखील सहकार्य करण्यासाठी तयार असल्याचे बुक्टो या प्राध्यापक संघटनचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी सांगितले.

विभागाने स्थापन केल्ल्या समितीत विद्यार्थी प्रतिनिधींना घ्या...

राज्यातील विद्यापीठांतील परीक्षा आणि त्यात येणाऱ्या अडचणींना कायम विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. त्याची जाण विद्यार्थी प्रतिनिधींना असते. यामुळे या परीक्षांच्या नियोजनासाठी शिक्षण विभागाकडून नेमण्यात आलेल्या समितीत विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी यांना घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने केली आहे.

हेही वाचा.... ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात

राज्यभरातील सर्वच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा आणि महाविद्यालयांच्या महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, यासंदर्भात काय करावे याबाबत सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली होती. त्यात ‘लॉकडाऊन’ उठल्यावर देखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली होती. यासंदर्भात चार कुलगुरूंची समिती तयार केली असून परीक्षांचे नियोजन कसे करावे, याबाबत ही समिती अहवाल देणार आहे. मात्र, अद्याप समितीचे कामकाज सुरु झाल्याचे दिसत नाही. मात्र, उलटणाऱ्या प्रत्येक दिवशी विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटल्यानंतर देखील राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये एकाच काळात परीक्षा घेण्याचे आणि निकाल लावण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर असणार आहे.

Last Updated : Apr 10, 2020, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.