मुंबई - बेघर व भटक्या भारतीय प्रजातीच्या प्राण्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी वर्ल्ड फॉर ऑल, पेडिग्री आणि मेट्रो कॅश अँड कॅरी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील बोरीवलीत शनिवार व रविवार (दि.२०-२१ जुलै) असा दोन दिवसीय 'पाळीव प्राणी दत्तक मोहीम' उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वर्ल्ड फॉर ऑल ही संस्था गेल्या काही वर्षांपासून सक्रियपणे अशा प्रकारचे दत्तक कार्यक्रम राबवत आहे. संबंधित दत्तक मोहिमेतून पाळीव प्राण्यांबद्दल अधिक जनजागृतीसाठी व्हावी असा संस्थेचा हेतू आहे. भारतीय प्रजातीच्या कुत्र्यांचे पालन करू इच्छिणाऱ्या लोकांना अधिक माहिती देऊन योग्य प्रशिक्षण पुरवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पाळीव प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांचा या दत्तक मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी वर्ल्ड फॉर ऑल या संस्थेचे सह-संस्थापक-अध्यक्ष तरोनीश बलसारा आणि मार्स इंडियाचे कार्पोरेट अफेअर्स संचालक नितीन कुलकर्णी उपस्थित होते.