ETV Bharat / city

'आयएएस आपल्या भेटीला’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी घडतील- मंत्री उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या हितासाठी या उपक्रमासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अभियांत्रिकीचे शिक्षण इंग्रजीसोबतच मराठी भाषेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण प्रयोग तंत्र शिक्षण विभाग करत आहे.

Breaking News
author img

By

Published : Mar 6, 2021, 1:12 PM IST

मुंबई- आयएएस आपल्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून उद्याचे प्रशासकीय अधिकारी घडण्यास मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'करियर कट्टा या अभिनव उपक्रमाच्या' उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये ‘करियर कट्टा’ या अभिनव उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ‘आयएएस आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला’ तसेच ‘आवाज गुरुजनांचा वेध देशाच्या भवितव्याचा’ या अभिनव उपक्रमांचा ऑनलाइन शुभारंभ सोहळा पार पडला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हितासाठी या उपक्रमासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अभियांत्रिकीचे शिक्षण इंग्रजीसोबतच मराठी भाषेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण प्रयोग तंत्र शिक्षण विभाग करत आहे. देशाच्या राजधानीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या व मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून याबद्दल लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

800 महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी
‘करियर कट्टा’ या उपक्रमाच्या माध्यमातून कट्ट्यावरच माणसे घडतात असे सांगत ‘करियर कट्टा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका निभावेल. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून राज्य गरुडभरारी घेईल यादृष्टीने प्रयत्न करू असा विश्वास राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात फेसबुक लाईव्ह आणि युट्युब लाईव्ह’च्या माध्यमातून राज्यातील 800 महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.