मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालीसा प्रकरणानंतर ( case of Hanuman Chalisa ) खार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलीस स्टेशनला जाऊन भेट घेतली त्यावेळी शिवसेनिकांकडून त्यांच्यावर करण्यात आलेले हल्ल्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले होते. सोमय्या यांनी म्हटलं आहे की, पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर खोटी आहे. याविरोधात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले. त्या एफआयआरवर मी सही केलेली नाही. त्या एफआयआरवरील सही बनावट असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. राज्य सरकारने बनावट एफआयआर दाखल केली असून सरकारची बनवाबनवी पकडली गेली आहे. असंही सोमय्या म्हणाले होते. तर किरीट सोमय्या यांच्या विरोधात खार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात यावा, याकरिता उच्च न्यायालयात सोमय्या यांनी धाव घेतली होती.या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. पोलिसांना यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर या याचिकेवर दोन आठवड्यापर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर 23 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला. किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ घातला. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्या. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस माझा FIR घेत नाहीत, असं म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला. हा एफआयआर बोगस असून त्याविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
हेही वाचा : Voting For President Election Today : राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा आहेत उमेदवार