ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरेंनी 20 मे लाच दिली होती एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट - Vertical split in Shiv Sena

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड ( Eknath Shinde Revolt ) केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडली आहे. महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा आजचा सहावा दिवस. आमदार फुटल्यापासून सुरू झालेला शिवसेनेचा बैठकांचा सिलसिला आजदेखील सुरू होता. कधी नव्हे ते आदित्य ठाकरे पक्ष संघटना वाढवण्यासाठी आता मुंबईत जागोजागी मेळावे, सभा घेत आहेत. या मेळावे, बैठकांमध्ये आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांवर धक्कादायक आरोप करीत असून, "20 मे रोजीच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर" ( Eknath Shinde Offered CM Post ) दिल्याचा धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी केला आहे.

Minister Aditya Thackeray
मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jun 26, 2022, 10:11 PM IST

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा ( Political crisis in Maharastra ) आजचा सहावा दिवस. आमदार फुटल्यापासून सुरू झालेला शिवसेनेचा बैठकांचा सिलसिला आजदेखील सुरू होता. कधी नव्हे ते आदित्य ठाकरे पक्ष संघटना वाढवण्यासाठी आता मुंबईत जागोजागी मेळावे, सभा घेत आहेत. या मेळावे, बैठकांमध्ये आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांवर धक्कादायक आरोप करीत असून, "20 मे रोजीच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर" दिल्याचा ( Eknath Shinde Offered CM Post ) धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी केला आहे. ते शिवसेना भवन येथे झालेल्या युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

20 मे रोजीच शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर : यावेळी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, "20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. त्यांनी एकनाथ शिंदेंना वर्षावर बोलवून घेतलं आणि त्यांच्या नाराजीबाबत विचारणा केली होती. मुख्यमंत्रीपद हवयं का? व्हायचं असेल तर या घ्या चाव्या... असं स्पष्ट सांगितलं होतं. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली." असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाचे 20 आमदार संपर्कात : इतकंच नाही तर, शिंदे गटाचे १५-१६ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, "एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटात आता फूट पडली आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असतो. शिंदे गटाचे २० आमदार सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असतात. यातल्या काही जणांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार केला जाऊ शकतो." असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हिम्मत असेल तर समोर या आणि बोला : "मी आतापर्यंत फुटबॉल, आयपीएलसाठी बेटींग बघितलं आहे. पण, आता पहिल्यांदाच पोलिटिकल बेटींग बघतोय. घोडेबाजार काय असतो ते माहिती होते पण हे तर अख्ख रेस कोर्स घेऊन गेलेत. हे तर चोरबाजारात पण मिळतील. यांची लायकी बघा. हिंमत होती, बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणता तर या ना पुढे आणि सांगा काय चुकीचं केलंय ते. आता बाळासाहेब असते, आनंद दिघे असते तर त्यांनी समजावलं असत त्यांच्याच भाषेत."

यांची लायकी तर दिसून आलीच : "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. तो एका चित्रपटातला डायलॉग आहे ना... 'हम शरीफ क्या हुये पुरी दुनिया ही बदमाश हुयी' हो आम्ही आहोत दिलवाले. पण, हा खोटारडेपणा महाराष्ट्र सहन करणार नाही. मी या खोटारडेपणाची चिरफाड करायला उतरलो आहे, तुम्हीदेखील सोबत या. रस्त्यावर उतरून प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या खोटेपणाची चिरफाड करायला हवी. आता आम्हाला जे जुने नवीन शिवसैनिक भेटत आहेत ते आम्हाला सांगताहेत की आम्हाला भेटायला येऊ देत नव्हते. वाशीचा पूल क्रॉस करू देत नव्हते. राक्षसी महत्त्वाकांक्षा काय असते हे जाणून घ्या. त्यासाठी हिंमत लागते, तेवढी लायकी पण लागते. लायकी तर दिसून आलीच आहे.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis : शिंदे गटाचे आमदार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार - दीपक केसरकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.