मुंबई- आरेमधील मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गला हलवण्यात आले आहे. आज या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी मेट्रो कारशेडच्या कामाचा आढावा घेतला. आजपासून मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात झालीये. आज सॉल्ट टेस्ट मशीनच्या साहाय्याने माती परीक्षण करण्यात आले. आरेऐवजी कारशेड कांजुरमार्गला होत असल्यानं पर्यावरण प्रेमींनी आनंद व्यक्त केलाय.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी मेट्रोचे अधिकारी आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा कल्याची माहिती नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी दिलीये.