ETV Bharat / city

Aditya Thackeray criticized rebel MLA : ३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली, आदित्य ठाकरे बंडखोरांवर बरसले - Aditya Thackeray criticized rebel MLA in Mahim Thane

शिवसेनेतील बंडखोरीच्या क्रांतीची ३३ देशांनी दखल घेतल्याचे वक्तव्य ( Aditya Thackeray criticized rebel MLA in Mahim Thane ) शिंदे गटाकडून करण्यात आले होते. युवासेना प्रमुख आणि शिवसेना ( Aditya Thackeray visit mahim ) नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून बंडखोरांवर टीकेची तोफ डागली. ३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला.

Aditya Thackeray criticized rebel MLA
बंडखोर विरोध आदित्य ठाकेर माहीम ठाणे
author img

By

Published : Aug 7, 2022, 9:43 AM IST

Updated : Aug 7, 2022, 10:23 AM IST

मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीच्या क्रांतीची ३३ देशांनी दखल घेतल्याचे ( Aditya Thackeray criticized rebel MLA in Mahim Thane ) वक्तव्य शिंदे गटाकडून करण्यात आले होते. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray visit mahim ) यांनी यावरून बंडखोरांवर टीकेची तोफ डागली. ३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. माहीम कोळीवाडा येथील शाखा क्रमांक १८२ ला भेट देत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. जॉगिंग ट्रॅकचे यावेळी त्यांनी उद्घाटन केले.

हेही वाचा - Breaking : निलेश राणेंनी दीपक केसकरांची उडविली खिल्ली, म्हणाले...

50 चा बार आहे तो आधीच फुटला, आता फुटणार नाही - माहीमने वाढवले, मोठे केले ते फुटले. त्याबद्दल वाईट वाटते. ज्यांना जायचे होते ते गेले, आता नवीन लोकांना संधी देणार. गरजेपेक्षा जास्त दिले त्याचे अपचन झाले म्हणून हाजमोला खाण्यासाठी ते तिकडे गेल्याची टीका बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात चांगचे सुरू होते, हे बघवले नाही म्हणून फुटले. उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोरोना काळात चांगले काम केले. जातीय वाद झाले नाहीत. महाराष्ट्र पुढे जात होता. तेव्हा विरोधकांना महाराष्ट्र पुढे जात आहे त्याला अडवायला सुरुवात केली, असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे शाखेत आगमन झाले तेव्हा फटाक्यांची आतषबाजी झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी फटक्यांवरून गद्दारांवर उपहासात्मक टोला लगावला. 50 चा बार आहे तो आधीच फुटला आहे. जे फुटायचे होते ते फुटले, आता कोणी नाही फुटणार, असे आदित्य ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम या गद्दारांनी रोखले - राज्यपाल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य केले होते. नुकतेच त्यांनी मुंबई ठाणे बद्दल वक्तव्य केले. मी बरेच राज्यपाल पाहिले, पण असे राज्यपाल पाहिले नाही. पी अलेक्झांडर पासून आतपर्यंत राज्यपाल झाले, पण असे राज्यपाल बघितले नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकार असताना आम्ही हजारो कोटींचे उद्योग महाराष्ट्रात आणले. उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळात चांगले काम केले. माहीमबद्दल बोलायचे झाले तर खूप काही बोलायला आहे. अनेक कामांच्या ठिकाणी माझ्या नावाचे फलक लावले नाही. आज आपले सरकार असते तर माहीम किल्ला पर्यटनासाठी खुला करून रोजगार उपलब्ध केला असता. अनेक गोष्टी आपण दादर माहीम येथे केल्या आहेत. महाराष्ट्र, मुंबई पुढे जात होती. महाराष्ट्र, मुंबईचा विकास अडवायचा विचार या बंडखोरांच्या मनात आला असावा. मुंबईचा विकास होतोय हे त्यांच्या पोटात दुखत होते. उद्या बेस्टला 75 वर्ष होत आहेत. आपण बेस्टचे तिकीट कमी केले. 5 किलोमीटर 5 रुपयात प्रवास असे आपण केले होते. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम या गद्दारांनी रोखले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एक म्हणतो प्रेम आहे आणि दुसरा टीका करून जातो - आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, गद्दारी केल्यानंतर काय काय कारणे दिली. एक कारण दिले वॉर्ड ऑफिस सहकार्य करत नाही. स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या माणसाला वॉर्ड ऑफिसर ऐकत नाही. एकजण तर कोण आदित्य, ओळखत नाही, एक आमदार आहे तो, असे वक्तव्य केले. हो मी साधा आमदार आहे, मी एक सच्चा शिवसैनिक आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. काहीजण सांगतात उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. आदित्य आम्हाला मुलासारखा आहे. पण, दुसरा येतो आणि टीका करून जातो. या गद्दारांबद्दल माझ्या मनात राग नाही, पण मनात वाईट वाटते, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली.

बंडखोरी म्हणत असले तरी हे गद्दार म्हणजे गद्दार राहणार - काय म्हणतात गद्दारी केली, क्रांती केली, 33 देशांनी क्रांतीची नोंद घेतली म्हणतात. 33 देशांनी गद्दारीची नोंद घेतली, बंडखोरी नाही. बंड करायचे होते, क्रांती करायची होती तर महाराष्ट्रात राहून करायची होती. गुवाहाटी गेले, झाडी, डोंगर बघत होते. तिथे आसामला पूर आला होता. पण, हे ट्रॅक पॅन्ट, टीशर्ट घालून मजा करत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असते तर त्यांनी पाण्यात उतरून तिथे मदत केली असती. त्यानंतर गोव्यात आले. उद्धवसाहेब यांनी राजीनामा दिला तेव्हा हे गोव्यात टेबलावर नाचत होते, बारमध्ये नाचतात तसे. त्यानंतर त्यांना गोव्यातून फरफटून महाराष्ट्रात आणले. हे जरी बंडखोरी म्हणत असले तरी हे गद्दार म्हणजे गद्दार राहणारच, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकार बेकायदेशीर ते पडणार - राज्यातील बेकायदेशीर सरकार आहे. जम्बो मंत्रिमंडळ आहे. पण, काही निर्णय घ्यायचा असेल तर दिल्लीवारी करतात. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. नेमका मुख्यमंत्री कोण आहे? माईक काय काढून घेतात, चिठ्ठी काय देत आहेत. आधी कधी झाले नव्हते. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि हे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे आजारी असताना फुटायचा विचार करत होते - दिल्लीत जाताना विमान हवेत 5-10 मिनिटे थांबवले म्हणे. एकदा महाराष्ट्रावर पण विमान थांबवा आणि काय चालू आहे ते बघा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे आजारी असताना हे निर्लज्ज गद्दार लोक मुख्यमंत्री कसे बनता येईल, फुटायचा विचार करत होते. हे राज्यकर्ते चालतील तुम्हाला? असा सवाल करत तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार आहात की नाही, आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांना सवाल केला. त्यावेळी शिवसैनिकांनी हात वरून करून पाठिंबा दर्शवला.

हेही वाचा - Dipak kesarkar : औरंगजेब क्रूर राजा, दिपक केसरकर यांच्याकडून अबू आझमींना प्रत्युत्तर

Last Updated : Aug 7, 2022, 10:23 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.