मुंबई - राज्यात शिंदे सरकारचा ( Shinde-BJP government ) प्रस्ताव बहुमताने पारित झाला. शिवसेनेचे व्हीप डावलून शिंदे गटाने मतदान केल्याचे सांगत आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray )यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच फितूर झालेले जन्मपक्षात असे करू शकतात, तर कर्म पक्षातही करणार. त्यामुळे जिकडे ते गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे, असा सूचक संकेत, ठाकरे यांनी भाजपाला दिले. विधानभवनात ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी मध्यवर्ती निवडणुकीचेही त्यांनी समर्थन केले.
भाजप-शिंदेगटाचे बहुमत सिद्ध - विधानभवनात आज बहुमत चाचणी घेतली. शिंदेगटाने भाजपासह बहुमत ( BJP-Shinde group proved majority ) सिद्ध केले. शिंदे आणि भाजपा गटाचे आता 164 तर महाविकास आघाडीकडे 99चे संख्याबळ आहे. न्यायालयात सर्व बाबी प्रलंबित असताना अशाप्रकारचे बहुमत घटनाबाह्य आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यावरून आता शिवसेनेतर्फे पुढील पावले उचलले जाण्याची शक्यता आहे. न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे समजते. आमच्या व्हीपचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात याचिका दाखल करू. ज्यांनी कोणी व्हीपचे उल्लंघन केले, त्यांच्यावर कारवाई तर करणारच, असे ते म्हणाले.
कालची निवडणूक घटनाबाह्य - शिवसेनेतून बंड करून जे आमदार पळून गेले त्यांना शिवसेना संपवायची आहे. शिवसेना कधीही संपणार नाही, तर दुप्पट ताकदीने पुढे येवून भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आमदार बंड करून इकडे तिकडे पळत आहेत. आत्ता सत्तेत आले, पण जेव्हा मतदारांसमोर जातील, तेव्हा त्यांना कळेल, आपल्या मतदारसंघातील मतदारांचे काय मत आहे ते, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर कालची निवडणूक घटनाबाह्य होती. कायद्याला अनुसरून नव्हती, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे फितूर झाले - तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २० मेला बोलावून विचारले होते, की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, त्याचा मी साक्षीदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेवरून हे सिद्ध होते, की ते आधीच फितूर झाले होते. जन्मपक्षात जर ते असे करू शकतात, तर कर्म पक्षातही करणार. त्यामुळे जिकडे ते गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे, असा इशारा त्यांनी भाजपाला देखील दिला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीला आम्ही तयार आहोत. दुप्पट ताकदीने शिवसेना पुढे येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Aaditya Thackeray : शिंदे गटापासून सावध राहा; आदित्य ठाकरे यांचा भाजपला सूचक टोला - Eknath Shinde
आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी शिंदे-भाजप सरकारवर ( Shinde-BJP government ) आज जोरदार हल्लाबोल केला. फितूर झालेले जन्मपक्षात असे करू शकतात, तर कर्म पक्षातही कसा धोका देणार नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जिकडे 'ते' गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे अशी टिका त्यांनी एकनाथ शिंदे गटावर केली.
![Aaditya Thackeray : शिंदे गटापासून सावध राहा; आदित्य ठाकरे यांचा भाजपला सूचक टोला Aditya Thackeray criticizes Shinde-BJP government](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15734008-233-15734008-1656933892978.jpg?imwidth=3840)