ETV Bharat / city

कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर वेगळा विचार करावा लागेल, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती

मुंबईची लोकल ट्रेन १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालीतर वेगळा विचार करावा लागेल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणाले.

additional commissioner of  municipality said if the number of Corona patients increases, they will think differently
कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर वेगळा विचार करावा लागेल, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती
author img

By

Published : Feb 11, 2021, 8:27 PM IST

मुंबई - शहरामध्ये मार्च पासून सुरु असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला होता. यामुळे सर्व व्यवहार टप्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहेत. मुंबईची लोकल ट्रेनही १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य सुरु करण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात सुमारे चारशेच्या आसपास असलेली रुग्णसंख्या ५५८ वर गेली आहे. रुग्णसंख्येत झालेली वाढ हि चिंताजनक वाढ नाही. मात्र, अशीच वाढ एमएमआर रिजनमध्ये पुढील दहा ते १२ दिवस होत राहिल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी सांगितले आहे.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली तर वेगळा विचार करावा लागेल, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची माहिती

रुग्णसंख्येत झाली वाढ -

मुंबईत मागीलवर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. २६०० पर्यंत गेलेली रुग्णसंख्या डिसेंबरमध्ये कमी होऊन ४८३ पर्यंत आली होती. जानेवारी महिन्यात ही रुग्णसंख्या ४०० ते ६०० दरम्यान होती. ३१ जानेवारीला ४८३ तर १ जानेवारीला ६३१ इतकी रुग्णसंख्या होती. मुंबईमधील कोरोनामुळे बंद असलेली लोकल ट्रेन १ फेब्रुवारीला सुरुवात झाली. लोकलसेवा सुरु करतानाच रुग्णसंख्या वाढेल अशी भीती वर्तवली जात होती. ही भीती खरी ठरताना दिसत आहे. १ फेब्रुवारीला ३२८ असलेली रुग्णसंख्या २ फेब्रुवारीला ३३४, ३ फेब्रुवारीला ५०३, ४ फेब्रुवारीला ४६३, ५ फेब्रुवारीला ४१५, ६ फेब्रुवारीला ४१४, ७ फेब्रुवारीला ४४८, ८ फेब्रुवारीला ३९९, ९ फेब्रुवारीला ३७५ तर १० फेब्रुवारीला ५५८ इतकी ऋणसंख्येत वाढ झाली आहे.

कोरोनाची आताची आकडेवारी -

मुंबईत बुधवारी १० फेब्रुवारीला ५५८ कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख १३ हजार २०६ वर पोहचला आहे. ४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ४०० वर पोहचला आहे. ४७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या २ लाख ९५ हजार ५२१ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ५३६९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ५५५ दिवस इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत २९ लाख ४९ हजार ६७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

तर कठोर निर्णय घ्यावा लागणार -

चाचण्यांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या ४ टक्के इतके आहे. ५० ते १०० ची जी वाढ आहे ती चिंताजनक म्हणता येणार नाही. पुढील दहा ते १२ दिवस आम्ही दक्षता घेणार आहोत. काल जी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. एमएमआर रिजन म्हणेजच मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, वसई विरार, मीरा भायंदर आणि पनवेल आदी विभागातील पुढील दहा ते १२ दिवसात अशीच वाढ होत राहिल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. त्याच वेळी नागरिकांनीही मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखावे या त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन काकाणी यांनी केले.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.