सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक अभिनेता आणि अभिनेत्री सिद्धार्थला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते. सिद्धार्थच्या मृत्यूने धक्का बसलेली त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला पोहोचली होती.
सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; अनेक कलाकारांनी दिला अखेरचा निरोप - ब्रम्हाकुमारी विधीनुसार अंत्यसंस्कार
16:42 September 03
सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
13:19 September 03
सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव घेऊन कूपर रुग्णालयातून रुग्णवाहिका रवाना
कूपर रुग्णालयातून अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाची अंत्ययात्रा निघाली आहे. त्याच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.
13:00 September 03
मुंबई पोलीस आज अधिकृत निवेदन जारी करणार
मुंबई पोलीस आज अधिकृत निवेदन जारी करणार आहेत. शवविच्छेदन अहवालही आज सिद्धार्थच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करणार आहेत. सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव सर्वप्रथम जुहू येथील ब्रह्माकुमारी कार्यालयात नेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. येथे पूजा केल्यानंतर, मृतदेह त्याच्या घरी नेण्यात येईल.
12:49 September 03
सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; कूपर रुग्णालयातून निघाली होती अंत्ययात्रा
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत कूपर रुग्णालयातून अंत्ययात्रा निघाली होती. सिद्धार्थला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याची मैत्रीण, अभिनेत्री शहनाज गिलसह अनेक कलाकार उपस्थित होते.
आज (3 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता सिद्धार्थचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवले जाणार आहे. शवविच्छेदन काल (2 सप्टेंबर) दुपारी केले. तीन डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. यावेळी दोन वॉर्डबॉय, व्हिडिओग्राफी टीम आणि दोन साक्षीदार उपस्थित होते.