ETV Bharat / city

एजाज खानला 3 एप्रिलपर्यंत कोठडी, एजाज म्हणाला- झोपेच्या फक्त ४ गोळ्या सापडल्या - अभिनेता एजाज खान न्यूज अपडेट

अमली पदार्थ तस्कर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याने चौकशीमध्ये अभिनेता एजाज खान याचे नाव घेतल्याने, एजाज खानला मंगळवारी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी एजाज खान याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आली आहे.

एजाज खान
एजाज खान
author img

By

Published : Mar 31, 2021, 6:14 PM IST

Updated : Mar 31, 2021, 7:03 PM IST

मुंबई- अमली पदार्थ तस्कर फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याने चौकशीमध्ये अभिनेता एजाज खान याचे नाव घेतल्याने, एजाज खानला मंगळवारी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी एजाज खान याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आली आहे.

दरम्यान मंगळवारी राजस्थानवरून मुंबई विमानतळावर आलेल्या एजाज खानला एनसीबी अधिकार्‍यांनी तब्यात घेऊन, अंधेरी व लोखंडवाला परिसरात जाऊन काही ठिकाणी छापेमारी केली होती. या दरम्यान एजाज खानच्या घरामधून फक्त चार झोपेच्या गोळ्या मिळाल्याचा दावा स्वतः एजाज खान याने केला आहे. एजाज खानच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या पत्नीला उपचारासाठी या झोपेच्या गोळ्या देण्यात येत होत्या, असा दावा एजाज खान याने केला आहे.

3 एप्रिलपर्यंत एजाज खानला एनसीबी कोठडी

तर दुसरीकडे एजाज खानचा दावा एनसीबीने फेटाळून लावला आहे. एजाज खान हा अमली पदार्थ तस्कर शाहरुख खान व शादाब बटाटा यांच्या टोळीचा सदस्य असल्याचे एनसीबीकडून न्यायालयात सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अभिनेता एजाज खान याला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - पॅन-आधार लिंक नसेल तर 10 हजारापर्यंत भरावा लागू शकतो दंड; आज शेवटची तारीख

Last Updated : Mar 31, 2021, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.