मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान मुजम्मिल शेख या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या झालेल्या चौकशीमध्ये अभिनेता दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहील यास 56 ग्रॅम मेफेड्रोनसह अटक करण्यात आलेली आहे.
व्हाट्सअप चॅट हाती
2019 ते 2021 या काळामध्ये धृव ताहील याने अमली पदार्थ तस्कर मुजम्मिल शेख यांच्याकडून एमडी अमली पदार्थ विकत घेतलेले होते. या संदर्भातील व्हाट्सअप चॅट अमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
2019 ते 2021 या दरम्यान अमली पदार्थ तस्कर मुजम्मिल शेख याच्याकडून ध्रुवने अमली पदार्थ घेतले होते. या काळात त्याने 6 वेळा तस्कर शेखला पैसे सुद्धा पाठवल्याचे समोर आले आहे.