ETV Bharat / city

अभिनेता अर्जुन रामपालला पुन्हा एनसीबीकडून समन्स

16 डिसेंबररोजी अभिनेता अर्जुन रामपाल याला पुन्हा एकदा एसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. बॉलिवूडमध्ये असलेले ड्रग्स सिंडिकेट प्रकरण एनसीबीकडून तपासले जात असताना अनेकजणांना यासंदर्भात अटक करण्यात आली आहे.

अर्जुन रामपाल
अर्जुन रामपाल
author img

By

Published : Dec 15, 2020, 1:47 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याला पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. 16 डिसेंबररोजी अभिनेता अर्जुन रामपाल याला पुन्हा एकदा एसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे. बॉलिवूडमध्ये असलेले ड्रग्स सिंडिकेट प्रकरण एनसीबीकडून तपासले जात असताना अनेकजणांना यासंदर्भात अटक करण्यात आली आहे.

अर्जुन रामपालच्या निकटवर्तीयांची झाली आहे चौकशी

याआधी अर्जुन रामपाल याची प्रेयसी गेब्रियल डिमेट्रीवेजची चौकशी करण्यात आलेली होती. तर अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ आगीसीलाओस यास एनसीबीने अटक केलेली आहे. अर्जुनचा जवळचा मित्र पॉल बार्टर यालासुद्धा एनसीबीकडून अटक करण्यात आलेली होती.

अमली पदार्थांसंदर्भात झाली होती चौकशी

11 नोव्हेंबर रोजी अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीकडून पहिल्यांदा समन्स पाठवण्यात आले होते. त्यानुसार 11 नोव्हेंबरला तो चौकशीसाठी एनसीबी कार्यालयामध्ये हजर झाला होता. एनसीबीच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर बाहेर आलेल्या अर्जुनने माध्यमांशी बोलताना आपला अमली पदार्थ तस्करीसोबत कुठलाही संबंध नसून एनसीबी अधिकाऱ्यांना हवी ती कागदपत्रे व माहिती दिलेली आहेत, असे म्हटले होते. मात्र यानंतरही एनसीबीच्या अधिकाऱ्यांचे अर्जुनच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.