ETV Bharat / city

सावधान..! मुंबईत 'फेसमास्क' न वापरणाऱ्या १९ हजार जणांवर एका दिवसात कारवाई

author img

By

Published : Feb 27, 2021, 3:20 PM IST

मुंबईत २० एप्रिल ते २६ फेब्रुवारीपर्यंत १७ लाख १३ हजार ३८५ लोकांवर कारवाई करून ३४ कोटी ६२ लाख ८४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर २६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १९ हजार ८४९ लोकांवर कारवाई करत ३९ लाख ६९ हजार ८०० रुयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Mumbai corona update
मुंबई

मुंबई - शहर परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह, गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत २० एप्रिल ते २६ फेब्रुवारीपर्यंत १७ लाख १३ हजार ३८५ लोकांवर कारवाई करून ३४ कोटी ६२ लाख ८४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर २६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १९ हजार ८४९ लोकांवर कारवाई करत ३९ लाख ६९ हजार ८०० रुयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नो मास्क कारवाई -

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने रेल्वे, रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एखादा व्यक्ती वारंवार दंडात्मक कारवाई करूनही मास्क घालत नसल्यास त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

एका दिवसात १९ हजार लोकांवर कारवाई -

२६ फेब्रुवारीला एकाच दिवसात १९ हजार ८४९ लोकांवर कारवाई करत ३९ लाख ६९ हजार ८०० रुयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलाद्वारे ४ हजार ५३ लोकांवर कारवाई करून ८ लाख १० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही रेल्वेमार्गावर ५१३ लोकांवर कारवाई करून १ लाख २ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.

आतापर्यंत १७ लाख लोकांवर कारवाई -

मुंबईत कोरोनाचा प्रसार मागील वर्षीच्या मार्च पासून सुरू झाला. कोरोनाचा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने पालिकेने मास्क घालण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यानंतरही या आवहानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे परिसर, पब, बार, रेस्टोरंट आदी गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. २० एप्रिल ते २६ फेब्रुवारी पर्यंत १७ लाख १३ हजार ३८५ लोकांवर कारवाई करून ३४ कोटी ६२ लाख ८४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

विभागवार कारवाई -

मुंबई महापालिकेच्या झोन क्रमांक एकमध्ये २ लाख ४४ हजार ३६७ लोकांवर कारवाई करून ४ कोटी ९४ लाख ४३ हजार ९००, झोन क्रमांक २ मध्ये ३ लाख ४ हजार ३७ लोकांवर कारवाई करून ६ कोटी ११ लाख ३८ हजार ७००, झोन क्रमांक ३ मध्ये २ लाख ३३ हजार ५१२ लोकांवर कारवाई करून ४ कोटी ७९ लाख ६५ हजार ४००, झोन क्रमांक ४ मध्ये २ लाख ६४ हजार ४६७ लोकांवर कारवाई करून ५ कोटी ३४ लाख ३८ हजार ८००, झोन क्रमांक ५ मध्ये १ लाख ८५ हजार ७१० लोकांवर करावी करून ३ कोटी ७३ लाख ५८ हजार ७००, झोन क्रमांक ६ मध्ये २ लाख १४ हजार ८३९ लोकांवर कारवाई करत ४ कोटी ३० लाख १२ हजार ४०० तर झोन क्रमांक ७ मध्ये २ लाख २९ हजार ७०८ लोकांवर कारवाई करत ४ कोटी ६५ लाख ७७ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून ३४ हजार ४८२ लोकांवर कारवाई करत ६८ लाख ९६ हजार ६०० तसेच रेल्वे हद्दीत २ हजार २६३ लोकांवर कारवाई करून ४ लाख ५२ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १७ लाख १३ हजार ३८५ लोकांवर कारवाई करून ३४ कोटी ६२ लाख ८४ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क लावण्याचे पालिकेचे आवाहन -

'कोविड – १९' च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये २०० एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे 'मास्क' वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणा-या किंवा चेह-यावर मास्क न लावणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.