ETV Bharat / city

Action Against Eight Police : आरोपीच्या मृत्यू प्रकरणात आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई - Breathless beating at the police station

चार वर्षापुर्वी धारावी पोलीस स्टेशनच्या कोठडीत चौकशीनंतर ( Death in custody of Dharavi police station ) तरूणाचा मृत्यू ( dies in Dharavi police station cell) झाला होता. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ निरीक्षकासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा ( Action against eight police personnel ) समावेश आहे. त्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्यात येणार आहे.

आरोपीच्या मृत्यू प्रकरणात आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई
Action Against Eight Police
author img

By

Published : Jun 19, 2022, 7:47 PM IST

मुंबई - चार वर्षापुर्वी धारावी पोलीस स्टेशनच्या कोठडीत चौकशीनंतर ( Death in custody of Dharavi police station ) तरूणाचा मृत्यू ( dies in Dharavi police station cell) झाला होता. या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ निरीक्षकासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा ( Action against eight police personnel ) समावेश आहे. त्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्यात येणार आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार धारावी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये तैनात असलेल्या या अधिकाऱ्यांनी चोरीच्या एका प्रकरणात चौकशीसाठी सचिन जैस्वार या 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते. त्याची सुटका झाल्यानंतर सहा दिवसांनी अल्पवयीन मुलाचा आजारपणात मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन जैस्वार याला 13 जुलै 2018 रोजी धारावी येथील त्यांच्या घरातून बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती.

हेही वाचा - अग्निपथ योजनेसंदर्भात तरुणांनी शांतता राखायला पाहिजे - रामदास आठवले.

पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण- सचिन तंदुरुस्त होता पण, पोलीस स्टेशनमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी काही आजार झाला. सुरुवातीला औषधोपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवसांनंतर 21 जुलै 2018 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली होती. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. एप्रिल 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करेपर्यंत मृतदेह जेजे रुग्णालयात पडून होता. त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंतिम संस्कार केले.

दरम्यान, विभागीय चौकशीत वरिष्ठ निरीक्षक मोहन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे, सहायक निरीक्षक अमोल माळी, उपनिरीक्षक शरद साबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रमेश सुर्वे, हवालदार किरण मराठे अशी या आठ पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असल्याचे उघड झाले. त्यांची वार्षिक वेतनवाढ तीन वर्षांसाठी थांबवण्यात येणार असल्याचे विभागाने जाहीर केले आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है'; राऊतांचा भाजपावर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.