ETV Bharat / city

Umesh Kolhe murder Case : अखेर आरोपी शहीम अहमदला एनआयएने केली अटक

अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे हत्याकांडाचा मुख्य आरोपी शहीम अहमदला Shaheem Ahmed arrested by NIA Umesh Kolhe murder Case अखेर अटक करण्यात आली आहे. एनआयएने सत्र न्यायालय परिसरातून त्याला अटक केली आहे.

Umesh Kolhe murder Case
Umesh Kolhe murder Case
author img

By

Published : Sep 21, 2022, 4:57 PM IST

Updated : Sep 21, 2022, 8:39 PM IST

मुंबई - अमरावतीत झालेल्या उमेश कोल्हे हत्याकांडाचा मुख्य आरोपी शहीम अहमदला Shaheem Ahmed arrested by NIA Umesh Kolhe murder Case अखेर अटक करण्यात आली आहे. एनआयएने सत्र न्यायालय परिसरातून त्याला अटक केली आहे. शहीमवर एनआयएने 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. उद्या त्याला न्यायालयात हजर केल्या जाणार आहे.

माहिती देताना वकिल

10 आरोपींना अटक - भाजपचे माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू मोहम्मद पैगंबर विरोधात वक्तव्य केले होते. याला समर्थन करणारे पोस्ट करणारे अमरावतीतील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एनआयए 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपीला आज कोर्ट परिसरातून अटक केल्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपी आता अटक करण्यात आले आहेत.

एनआयएन 180 दिवसाची वेळ मागण्यात आली - या प्रकरणात आरोप पत्र दाखल करण्यासाठी मुदत आज संपत असल्याने, पुन्हा मुदत वाढवून देण्यात यावी यासाठी एनआयएकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने एनआयएला 90 दिवसाची वाळवी वेळ दिली आहे एनआयएन 180 दिवसाची वेळ मागण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत असल्याचे देखील पुरावे मिळाले - उमेश कोल्हे हत्याकांडामध्ये एनआयएला उद्या तपासाला 180 दिवस पूर्ण होत असल्याने त्यांना आरोप पत्र दाखल करण्या अवश्यक होते. मात्र, एनआयएने सोमवारी सत्र न्यायालयात अर्ज करून या प्रकरणात आणखी 180 दिवस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे. एनआयए असा युक्तिवाद केला की या प्रकरणांमध्ये आरोपींकडून कुठल्याही प्रकारचे तपासात सहकार्य मिळत नाही. तसेच, आरोपींची लिंक ही आंतरराष्ट्रीय टेररिझम सोबत असल्याचे देखील पुरावे मिळाले आहेत असा असा दावा एनआयए केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी तपास करणे बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ ​​भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण? - नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

Last Updated : Sep 21, 2022, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.