मुंबई - जेवनाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून 31 ऑक्टोबर 2016 रोजी सुरेश हरीजन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील चौथ्या आरोपीला तब्बल 5 वर्षांनंतर पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन आरोपीला अटक केली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जेवनाचे पैसे न दिल्याच्या वादातून 31 ऑक्टोबर 2016 रोजी सुरेश हरीजन यांना चार जणांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या सुरेश हरीजन यांचा मृत्यू झाला. या संदर्भात वनराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी विकास जगन्नाथ मंडल उर्फ काका (32), पीनेप सुकलाल देवनाथ उर्फ राजू (27) सुब्रतो रुपये उर्फ जंगली विश्वास (25) यांना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील चौथा आरोपी पिंटू रवींद्र सरदर हा गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. आरोपी हा पश्चिम बंगालच्या चंदनदहामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनूसार पोलिसांनी चंदनदहामध्ये जाऊन आरोपीला अटक केली.