मुंबई - उपनगरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या आरोपीला अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटचे पोलीस निरीक्षक रूपेश नाईक व पथक हे गस्त घालत होते. त्यावेळी ईक्वीनॉक्स बिझनेस पार्क समोरील झाडाजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या उभा असल्याचे आढळुन आले. गस्ती पथकास पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यास पथकाने पकडले.
२१० ग्रॅम मेफेड्रॉन आढळले -
दरम्यान, त्या व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये २१० ग्रॅम मेफेड्रॉन ( एमडी ) हा अंमली पदार्थ मिळून आला. त्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने हे अंमली पदार्थ कोठून व कोणाकडून आणले? याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - भिवंडीत फर्निचर गोदामासह कारखान्याला भीषण आग; अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल