ETV Bharat / city

Corona Variant in Mumbai : मुंबईत कोरोनाच्या ८ व्हेरियंटचे रुग्ण; जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून आले समोर

author img

By

Published : Dec 17, 2021, 7:42 PM IST

Updated : Dec 17, 2021, 9:02 PM IST

मुंबईत कोरोनाचे कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रॉन या तीन व्हेरियंट व्यतिरिक्त नवा व्हेरियंटचा प्रसार झाल्याचे आढळून ( Corona Variant in Mumbai ) आले आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या अल्फा, केपा, नाईन्टीन-ए, द्वेन्टी-ए, डेल्टा डेरिव्हेटीव्ह या ५ व्हेरियंटचे रुग्णही आढळून आले आहेत. अशी माहिती पालिकेने केलेल्या जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून समोर आली आहे. मात्र या ५ व्हेरियंटचा मुंबईत प्रसार झाला नसल्याने त्यांची नावे चर्चेत आलेली नाहीत.

Corona Variant in Mumbai
मुंबईत कोरोनाच्या ८ व्हेरियंटचे रुग्ण

मुंबई - मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार सुरू आहे. या प्रसारा दरम्यान कोरोना, डेल्टा आणि ओमायक्रॉन या विषाणूचे रुग्ण आढळून ( Omycron Patients in Mumbai ) आले आहेत. आता मुंबईत कोरोनाचे या तीन व्हेरियंट व्यतिरिक्त नवा व्हेरियंटचा प्रसार झाल्याचे आढळून ( Corona Variant in Mumbai ) आले आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या अल्फा, केपा, नाईन्टीन-ए, द्वेन्टी-ए, डेल्टा डेरिव्हेटीव्ह या ५ व्हेरियंटचे रुग्णही आढळून आले आहेत. अशी माहिती पालिकेने केलेल्या जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून समोर आली आहे. मात्र या ५ व्हेरियंटचा मुंबईत प्रसार झाला नसल्याने त्यांची नावे चर्चेत आलेली नाहीत.

एकूण 7 लाख 66 हजार 213 रुग्णांची नोंद -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून गेले पावणे दोन वर्षे मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मुंबईत या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या. कोरोना विषाणूमुळे पहिली तर डेल्टा व्हेरियंटमुळे दुसरी लाट आली. सध्या मुंबईमध्ये ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 7 लाख 66 हजार 213 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 45 हजार 401 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 873 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 2572 दिवस इतका आहे. मुंबईमधील 18 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.

मुंबईत कोरोनाच्या ८ व्हेरियंटचे रुग्ण -

  • ऑगस्ट २०२१ मधील पहिल्या फेरीत १८८ रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आली. त्यात १२८ रुग्ण ‘डेल्टा’, २ रुग्ण अल्फा तर केपा व इतर व्हेरियंटचे २४ रुग्ण आढळून आले.
  • सप्टेंबर २०२१ मधील दुसऱ्या फेरीत ३७६ रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आली. त्यात ३०४ रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअन्ट’चे, २ रुग्ण ‘नाईन्टीन-ए’, ४ रुग्ण ‘द्वेन्टी-ए’ या व्हेरियंटचे आढळून आले.
  • ऑक्टोबर २०२१ मध्ये तिसऱ्या फेरीत ३४३ रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात आली. त्यात ‘डेल्टा व्हेरिअन्ट’चे १८५, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे ११७ रुग्ण आढळून आले.
  • नोव्हेंबर २०२१ मधील चौथ्या फेरीत २८१ रुग्णांच्या जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या करण्यात आल्या. त्यात २१० रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ तर ७१ ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या व्हेरियंटचे आढळून आले.
  • डिसेंबर २०२१ मधील पाचव्या फेरीत २२१ रुग्णांच्या जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या करण्यात आल्या. त्यात ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे १९५, तर २ नमुने ‘ओमायक्रॉन’चे आढळून आले.
  • डिसेंबर २०२१ मधील सहाव्या फेरीत २९७ रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात आली. त्यात १८३ रुग्ण ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’चे, १०५ रुग्ण ‘डेल्टा व्हेरिअंट’चे तर ७ रुग्ण ओमायक्रॉन या व्हेरियंटचे आढळून आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती -

मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने घेऊन जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत पालिकेकडून जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह तसेच जे लवकर बरे होत नाहीत अशा रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांसाठी पाठवले जातात. यामुळे रुग्णांना नेमका कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग आहे याची माहिती मिळते. अशी माहिती मिळाल्याने रुग्णावर वेळीच उपचार करता येतात. तसेच एखाद्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यास त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईमधील कोरोनाचे 8 व्हेरियंटचे प्रकार -

  1. कोरोना
  2. डेल्टा
  3. अल्फा
  4. केपा
  5. नाईन्टीन-ए
  6. द्वेन्टी-ए
  7. डेल्टा डेरिव्हेटीव्ह
  8. ओमायक्रॉन

हेही वाचा - Department Funds Allocation : मुख्यमंत्री शिवसेनचा, मात्र सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना

Last Updated : Dec 17, 2021, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.