ETV Bharat / city

शैक्षणिक वर्ष संपल्याचे अखेर जाहीर, शिक्षण संचालकांनी काढले सुट्टीचे परिपत्रक - शैक्षणिक वर्षा बद्दल बातमी

शैक्षणिक वर्ष संपल्याचे अखेर जाही केले आहे. शिक्षण संचालकांनी काढले सुट्टीचे परिपत्रक काढले आहे.

academic year has been declared over
शैक्षणिक वर्ष संपल्याचे अखेर जाहीर, शिक्षण संचालकांनी काढले सुट्टीचे परिपत्रक
author img

By

Published : Apr 30, 2021, 8:35 PM IST

मुंबई - राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १३ जून तर विदर्भातील शाळांना २८ जूनपर्यंत सुट्टी जाहीर केल्याचे आदेश आज शिक्षण संचालकांनी काढले आहेत. राज्यातील शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहेत.

academic year has been declared over
शैक्षणिक वर्ष संपल्याचे अखेर जाहीर, शिक्षण संचालकांनी काढले सुट्टीचे परिपत्रक

शिक्षण संचालकांनी घेतली दखल -

ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाला पूर्ण विराम देत शैक्षणिक वर्ष संपल्याचे जाहीर करून १ मे पासून शाळांना सुट्टी देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण संचालकांकडे वारंवार केली होती. याबाबत वृत्त सुद्धा ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. सतत याबद्दल पाठपुरावा सुद्धा करण्यात आला होता. याची दखल घेत राज्यतील शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 13 जून तर विदर्भातील शाळांना 28 जूनपर्यंत सुट्टी जाहीर केल्याचे आदेश काढले आहेत. सध्या शिक्षक निकालाचे कामे करत असून १ मेपर्यंत बहुतेक शाळांचे काम पूर्ण होणार असल्याने १ मे ते १३ जूनपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला पूर्णविराम देत राज्यातील शिक्षकांना शिक्षण संचालकांनी मोठा दिला दिला आहेत.

राज्यातील शिक्षकांना दिलासा -

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षी एप्रिल पासून शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले होते. तर अनेक शिक्षकांना कोरोनाच्या कामासाठी शासनाने जुंपले होते. त्यामुळे मे महिन्याची सुट्टी शिक्षकांना मिळाली नव्हती. शिक्षकांनी एप्रिल महिन्यापासून सतत १३ महिने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले. ऑनलाइनचा कोणताही अनुभव नसतांना झूम, गुगल मिट तसेच इतर प्लॅटफॉर्मचा वापर करत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. जे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नव्हते त्यांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन ऑफलाइन शिक्षण दिले. विविध प्रशिक्षणे घेतली. सतत डेस्कटॉप, लॅपटॉप व मोबाइलवर काम केल्यामुळे अनेक शिक्षकांना दृष्टीदोषाच्या आजाराने ग्रासले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.