ETV Bharat / city

MLA Abu Azmi : 'मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अजूनही अटक का नाही?'

समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व आमदार अबू आझमी ( MLA Abu Azmi ) परगावी असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून भोंगा या विषयावरून वादग्रस्त वक्तव्य केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अजून अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला आहे. गृहमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

अबू आझमी
अबू आझमी
author img

By

Published : Apr 25, 2022, 7:56 PM IST

मुंबई - भोंग्यावरून निर्माण झालेल्या वादावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (सोमवारी) सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याबैठकीला समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व आमदार अबू आझमी ( MLA Abu Azmi ) परगावी असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून भोंगा या विषयावरून वादग्रस्त वक्तव्य केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अजून अटक का केली नाही? असा प्रश्न विचारला आहे. गृहमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

'मकोका सारखा कडक कायदा करावा' : महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर आपण बोलावलेल्या बैठकीला मी उपस्थित राहू शकलो नाही. तुम्ही ही बैठक बोलावली आहे. ज्यात मला माझ्या काही मागण्या मांडायच्या आहेत. मी हा विषय सभागृहात अनेकदा उपस्थित केला आहे की, जर कोणी कोणताही धर्म, धार्मिक व्यक्ती, धार्मिक गुरु, धार्मिक ग्रंथ, मंदिर-मशीद, कोणत्याही धर्माच्या आदरणीय व्यक्तीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास, त्यांचा अपमान केला तर त्यांचा अपमान होईल. मग त्याच्यासाठी मकोकासारखा कडक कायदा करून त्याला अटक करावी. त्यामुळे धार्मिक वाद निर्माण करून राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना आळा बसेल, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

'काहींना समाजात तेढ निर्माण करायचा आहे' : काही महिन्यांपूर्वी त्रिपुरामध्ये कुराण शरीफ आणि मशिदी जाळण्यात आल्या, मालेगाव, अमरावती आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शने झाली. त्याचप्रमाणे छत्रपतींच्या मातोश्री आदरणीय जिजाबाई भोसले यांच्या जीवनावरील अवमानकारक पुस्तकाचा लेखक जेम्स लेन याने शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यात द्वेष निर्माण केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या पत्नी माँ साहेब यांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. तसेच राज्यातील काही समाजकंटकांना समाजात तेढ निर्माण करायची आहे, ती रोखणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'राज ठाकरेंवर कारवाई का नाही?' : अजान बाबत वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण करणार्‍या राज ठाकरेंना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. एकीकडे पोलीस विभाग मशिदीवरील लाऊडस्पीकर परवानगीनुसार सुरू असल्याचे सांगत आहे. तरीही राज ठाकरे मशिदीसमोरील लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा म्हणणार असल्याचे सांगत, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? दाहक भाषण केले जात आहे? राज्यात कायदा मोठा की व्यक्ती? संविधान सर्वांत श्रेष्ठ आहे. असे किती लोक आहेत ज्यांच्यावर छोट्या-छोट्या चुकांसाठी कारवाई झाली आणि राज ठाकरेंनी एवढी मोठी चूक करूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ज्याप्रमाणे मुस्लिम समाजाच्या अजानमध्ये 'अल्लाह-हु-अकबर' म्हटले जाते, म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सर्व धर्म आपल्या ईश्वराची पूजा करतात आणि त्याला सर्वश्रेष्ठ मानतात आणि हा अधिकार प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला दिला जातो. आपल्या राज्यघटनेत देशाने, त्यांना दिला आहे. जेणेकरून ते आपला धर्म पसरवू शकतात. परंतु धार्मिक तेढ निर्माण करून समाजात फूट पाडणाऱ्यांसाठी मकोकासारखा कडक कायदा करावा आणि लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे, असेही अबू आझमी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Aurangabad Rally : राज ठाकरेंच्या सभेला अद्यापही परवानगी नाही; मनसेकडून जय्यत तयारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.