ETV Bharat / city

कोरोनाचा फटका : मुंबईतील ६० ते ६५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या - मुंबई सायन हॉस्पिटल

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना ऑक्सिजन, आयसीयू बेड्स तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे.

surgeries in Mumbai
surgeries in Mumbai
author img

By

Published : Apr 17, 2021, 8:12 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. कोरोना रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटीलेटरचीही गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. यासाठी महापालिका रुग्णालयात टाळता येतील अशा सुमारे ६० ते ६५ टक्के शास्त्रकिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर तातडीने करावयाच्या शस्त्रक्रियेलाच प्राधान्य दिले जात आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांना प्राधान्य

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार फेब्रुवारीपासून पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना ऑक्सिजन, आयसीयू बेड्स तसेच व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. मुंबईत दररोज ८ ते ११ हजार रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. त्यापैकी १५ ते १६ टक्के रुग्णांना लक्षणे असतात. त्यापैकी काहींना ऑक्सिजनची आवश्यकता असते. काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये उपचार करावे लागतात. तर काहींना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागतात. यामुळे बेडची कमतरता भासत आहे.

६० ते ६५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

कोरोना रुग्णांचा जीव वाचावा म्हणून महापालिकेच्या, खासगी रुग्णालयात तसेच कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना इतर आजारांचेही रुग्ण येतात, अपघात झालेले, हृदय विकाराचा त्रास असलेले, अपघात झालेले आदी इतर गंभीर आजार असलेले रुग्ण तसेच प्रसूती होणाऱ्या महिला रुग्ण येतात. अशा रुग्णांना रुग्णालयात भरती करून घ्यावे लागते. त्यापैकी काहींवर शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यापैकी ज्या रुग्णांवर सध्या शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही, अशा सुमारे ६० ते ६५ टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

अत्यावश्यक शस्त्रक्रियांना प्राधान्य

मुंबई महापालिकेचे सायन हे एक मोठे रुग्णालय आहे. त्यामध्ये दिवसाला विविध विभागात ३५० शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यापैकी १०० ते १२५ शस्त्रक्रिया तातडीच्या आणि आवश्यक असतात अशा शस्त्रक्रिया सध्या केल्या जात आहे. इतर रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्याने त्या पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाची परस्थिती आटोक्यात आल्यावर त्या रुग्णांना संपर्क करून शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

या ठिकाणी करावी लागते शस्त्रक्रिया

मुंबईत महापालिकेची केईएम, नायर, सायन, ट्रॉमा केअर, कूपर ही मोठी रुग्णालये आहेत. तर १७ जनरल रुग्णालये आहेत. तसेच २७ प्रसूतीगृहे आहेत ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या जातात. मोठ्या एका रुग्णालयात ३५०, जनरल एका रुग्णालयात सुमारे ३० ते ४० शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच प्रसूतीवेळीही काही शस्त्रक्रिया केल्या जातात. यामधील आवश्यक असलेल्या ३५ ते ४० टक्के शस्त्रक्रियाच सध्या केल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.