आज.. आत्ता...
१.०७ PM: नवी मुंबई - सुडाने वागण्याची आमची प्रवृत्ती नाही- उध्दव ठाकरे
११.५९ AM :नवी मुंबई - मी काही उमेदवार नाही, त्यामुळे मला आचारसंहितेची कोणतीही भीती नाही - नरेंद्र पाटील ;साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत नरेंद्र पाटील उतरण्याच्या चर्चेला पूर्णविराम
११.४७ AM : मुंबई - विधानसभेच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज बैठक;शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक; अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील राहणार उपस्थित
११.४६ AM : पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, मंडई मध्ये रस्त्यावर ठिय्या मांडणाऱ्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; मंडई पोलीस चौकीत आणलेल्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
११.३६ AM : हिंगोली - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गांधीचौक येथे निदर्शने करण्यासाठी जमले
११.३४ AM : नवी मुंबई - अण्णासाहेब पाटील जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आगमन; अद्याप उध्दव ठाकरे उपस्थित नाहीत
११.२९ AM : पुणे - पवारांवरील ईडी कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मंडईतील टिळक पुतळा येथे निदर्शने
१०.४५ AM : रायगड - उरण येथील ओएनजीसीच्या एपीयू युनिटमधून पुन्हा एकदा वायुगळती; ओव्हरफ्लो झालेल्या टाकीतून ज्वालाग्राही नाफ्ता थेट नाल्यातून पीरवाडी समुद्रापर्यंत पोहचला; खबरदारीचा उपाय म्हणून ओएनजीसीच्या अप्पू गेटपासून समुद्राच्या मार्गावरील वाहतूक बंद
९.४० AM : पुणे - रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी घरांमधे पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच 13 ठिकाणी झाडं पडल्याच्या अग्निशमन दलाकडे तक्रारी दाखल
९.०८ AM : नांदेड - कॅनडामध्ये जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या ग्राहकाचे पैसे खात्यातून केले लंपास...!
९.०५ AM : पुणे - शरद पवारांवर ईडी मार्फत गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बारामतीत कडकडीत बंद, बाजारपेठ- दुकानांना टाळं. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या शाखांना सुट्टी
९.०० AM : नाशिक - शरद पवार यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याचे पडसाद; जिल्ह्यातील नैताळे गावात 100 टक्के बंद ; भाजप सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे.
८.५६ AM : रायगड - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात रात्रीपासून मुसळधार पाऊस
८.५३ AM : हिंगोली - बाळापूर पोलिसांनी जप्त केला 22 लाखांचा गुटखा