LATEST LIVE UPDATES -
- 4:00PM- समांतर रंगभूमीसाठी झटणारा सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड
- 3:59PM-आविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्व अरुण काकडे काका यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन
- 3:52PM-कारंजा मनोरा मतदारसंघाचे राष्ट्रवादी-काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार प्रकाश डहाके यांच्या प्रचाराकरिता जाहीर सभेसाठी काहीच वेळात शरद पवार यांचे वाशिम जिल्ह्यातील मनोरा येथे आगमन होणार आहे
- 3:41PM-वडाळा येथे टाटा पॉवरच्या उच्च विद्युत प्रवाहामुळे भाजल्याने 5 जण जखमी, जखमींना केईएम रुग्णालयात केले उपचारासाठी केले दाखल
- 3:15PM-पक्षविरोधी नाही तर उमेदवारांविरोधी नाराजी शिवसेना भाजप बंडखोरांच स्पष्टीकरण
- 3:00PM-वडाळा येथील गणेश नगरमध्ये हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने 2 महिलांसह 3 लहान मुले गंभीररीत्या जखमी, उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल
- 1:50 PM-: काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री अमरीश पटेल यांचा भाजप प्रवेश....मुख्यमंत्र्यांच्या उपस्थीत केला प्रवेश
- 1:50 PM- शिरपूर येथे मुख्यमंत्र्यांच आगमन
- 1:25 PM - येत्या 5 वर्षात आम्ही सर्व शेतकऱयाचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे
- 12:11 PM - एकनाथ खडसे म्हणतात... महाआघाडीलाच सत्तेचा कौल मिळेल
- 12:59 PM - पीएमसी बँक प्रकरण- नागरिकांनी केले रस्ता रोको आंदोलन
- 1:04 PM - तरुणांनी राजकारणापासून दूर पळू नये, राजकारण म्हणजे 'डर्टी गेम' नाही - जम्यांग त्सेरिंग नामग्याल (खासदार, लडाख)
- 12:45 PM - पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयलच्या राकेश वाधवा व सारंग वाधवा यांना दिवाणी न्यायालयात हजर करणार, त्यापूर्वी न्यायालयात पीएमसी बँकेच्या ग्राहकांची मोठी गर्दी
- 12:48 PM - करमाळ्यात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
- 12:37 PM - शिर्डी विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे स्वागत, साईबाबांची आरती चालू असल्याने उद्धव ठाकरे यांनी साई दर्शन न घेताच संगमनेरकड़े हेलिकॉप्टरने रवाना
- 12:38 PM -पवार साहेब कोणाबरोबर सुडाने वागले नाहीत, माझे अश्रु सांगण्यापेक्षा युती कशी टिकेल हे उद्धव ठाकरे यांनी पाहावे- अजित पवारांचा
- 12:41 PM - करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठींबा जाहीर - अजित पवार
- 12.28 PM - काँग्रेसचे अमरीश पटेल यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात होणार प्रवेश
- 11.33 AM - रत्नागिरी; वीज पडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
- 10.33 AM - युतीच्या वाटाघाटीत भाजपला घाटा, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर अपक्ष निवडणूक निर्णयावर ठाम - भाजपचे बंडखोर आमदार नरेंद्र पवार
- 10:03 AM - हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात पेंटग्राफमध्ये लागली आग; आग नियंत्रणात
- 9:39 AM - रामटेक मतदारसंघातले राजकीय वातावरण तापले; शिवसेना बंडखोर आशिष जैसवाल यांची भाजपचे उमेदवार मल्लीकार्जुन रेड्डी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार...रेड्डी यांच्या आई आणि पत्नीबाबत अशोभनीय वक्तव्य केले म्हणून तक्रार