मुंबई - मुंबईत पाऊस पडत असल्याने दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले. हे झाड गुलमोहराचे असून ते खुद्द बाळासाहेबांनीच लावलेले होते. दरम्यान, शिवसेनेत फूट पडली असताना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळील झाड कोसळल्याने उलट-सुलट चर्चेला वेग आला आहे.
बाळासाहेबांनी लावलेले झाड कोसळले - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुलमोहराचे झाड लावले होते. याच झाडाशेजारी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर स्मृती स्थळ उभारले आहे. गुलमोहराचे हे झाड पावसामुळे कोसळले आहे. यामुळे स्मृती स्थळाच्या बाजूला लावण्यात आलेल्या संरक्षण कुपणाचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
हेही वाचा - CM Nanded Hingoli Visit : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा नांदेड, हिंगोली दौरा रद्द