मुंबई : शेकाप पक्षाचे स्वर्गीय नेते आणि माजी आमदार भाई गणपतराव देशमुख ( Former MLA Bhai Ganapatrao Deshmukh ) यांचा विधानभवनाच्या आवारात पुतळा उभारला जाणार आहे. हा पुतळा उभारण्यास राज्य सकारात्मक आहे. याबाबतची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई ( State Industry Minister Subhash Desai ) यांनी विधान परिषदेत दिली आहे. विधान परिषदेच्या आवारात ( premises of the Legislative Council ) शेकापचे स्वर्गीय नेते गणपतराव देशमुखांचा स्मारक रुपी पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
पुतळा असा उभारा -
गणपतराव एका पक्षात राहून ११ वेळा निवडून आले. दुष्काळ असलेल्या संपूर्ण तालुक्यात पाणी आणून देऊ, तोपर्यंत मरणार नाही असे म्हणाले होते. गेल्यावर्षी पाणी आले आणि या वर्षी त्यांचे निधन झाले. प्रत्येक अडी अडचणींच्या वेळी गणपतरावांनी प्रश्न सोडवल्याचे, जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले. तर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीसुद्धा स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख ( Bhai Ganapatrao Deshmukh ) यांच्या आठवणींना उजाळा दिला.
देशमुख यांना पाणी आणण्यासाठी माझ्याकडून फार प्रयत्न झाले होते. म्हैसाळच्या लिफ्टमधून सांगोल्यात पाणी नेले होते. टेंभूच्या योजनेत त्यांचे फार योगदान होते. राज्य सरकारकडे पैशाची चणचण होती. मात्र गणपतरावांना पाणी बघायला मिळाले. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार पुतळा उभारणार आहे. परंतु स्मारक करायचे असेल तर त्यांच्या कामाचे काहीतरी दिसायला पाहिजे. तशा प्रकारे पुतळा उभा करा, अशा सूचना सभापतींनी दिल्या.
पुतळ्याबाबत सरकार सकारात्मक -
राज्य सरकारकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत माहिती दिली आहे. सभापतींनी चांगली सूचना आहे. गणपतराव यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याची कायमस्वरुपी आठवण जतन करु, गणपतरावांची आठवण कायम सदस्यांना येईल. त्यांचा कार्यकाळ दीर्घकालीन होता. महाराष्ट्राला सदैव मार्गदर्शन व्हावे, असे कार्य केले पाहिजे. शासन त्यासाठी सकारात्मक आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावू, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर ( Speaker Ramraje Naik-Nimbalkar )यांनी स्पष्ट केले.
A statue of Ganapatrao Deshmukh : गणपतराव देशमुख यांचा पुतळा विधान भवनाच्या आवारात उभारणार - शेकाप पक्षाचे गणपतराव देशमुख
गणपतराव देशमुख ( Statue of Ganapatrao Deshmukh ) यांचा विधान भवनाच्या आवारात पुतळा उभारला जाणार आहे. याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्याच्या उद्योगमंत्र्यांची माहिती