मुंबई - काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची आढावा बैठक ( Review Meeting of Congress Leaders ) मंगळवारी (दि. 19) सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीतून काँग्रेसच्या मंत्र्यांचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यासोबतच महा विकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला मिळणाऱ्या दुजाभावाबाबत अनेक मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात काँग्रेस मंत्र्यांच्या प्रस्तावाबाबत सर्वच काँग्रेस मंत्र्यांनी आक्रमक व्हावे, अशा सूचना काँग्रेस मंत्र्यांना या आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ), मंत्री यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ), मंत्री असलम शेख ( Minister Aslam Shaikh ), मंत्री अशोक चव्हाण ( Minister Ashok Chavan ), मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांच्यासहित सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस आमदारांच्या कामांना प्राधान्य - महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची कामे होत नाहीत. कॉंग्रेस आमदारांना पुरेसा निधीही मिळत नसल्याचा सूर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आमदारांकडून काढला जातो. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर काँग्रेस आमदारांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे या मुद्द्यावर आढावा बैठकीत चर्चा झाली असून काँग्रेस आमदारांच्या कामांना काँग्रेस मंत्र्यांकडून प्राधान्य दिले जाईल, असे बैठकीमध्ये ठरले आहे. तसेच इतर मंत्र्यांकडे काँग्रेस आमदारांच्या असलेल्या कामांबाबत काँग्रेस मंत्री पाठपुरावा करण्याच्या सूचना काँग्रेस मंत्र्यांना या बैठकीतून देण्यात आले आहेत.
जनतेशी संपर्क वाढविण्याच्या सूचना - काँग्रेसचे पालकमंत्री आणि संपर्कमंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेशी संपर्क वाढवण्यावर भर देण्याबाबतच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात काँग्रेस राज्यात कमकुवत होत गेलेली आहे. काँग्रेस नेत्यांचा जनतेशी संपर्क कमी होत असल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या पालकमंत्री आणि संपर्क मंत्र्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देत जनतेशी संपर्क वाढवण्यावर भर देण्याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली आहे.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत चर्चा - लवकरच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबईच्या दौऱ्यावर येणार ( Rahul Gandhi will come in Mumbai ) आहेत. या दौऱ्याबाबत च्या नियोजनाची चर्चाही या बैठकीत झाली. राहुल गांधीच्या दौऱ्याबाबत अद्याप तारीख निश्चित झाली नसली तरी, या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांच्या होणाऱ्या भेटीगाठी बाबत या बैठकीतून चर्चा करण्यात आली आहे.
हेही वाचा - Rahul Gandhi will come in Mumbai : राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे काँग्रेसच्या गोटात भीतीचे वातावरण