मुंबई- अभिनेत्री कंगना राणौतच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कंगना गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट करत असल्यामुळे जातीय सलोखा, कायदा, सुव्यवस्था व शांततेचा भंग होत असल्याकारणाने तिचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात यावे. अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. आली काशीफ खान देशमुख असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.
बॉलिवूडमध्ये दोन गट असून मुस्लिम बहूल बॉलीवूडमध्ये मी स्वतः नाव मोठे केले असल्याचे ट्विट कंगना राणौतने केले होते. कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख पप्पू सेना असा केल्यामुळे शांततेचा भंग होत आहे. तिने ट्विटरच्या माध्यमातून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. दरम्यान या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी ट्विटरलासुद्धा प्रतिवादी करण्याची मागणी केली आहे.
आधीही कंगनाविरोधात याचिका -
हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांत परस्परांविषयी द्वेष उत्पन्न होईल आणि जातीय सलोखा बिघडेल असे टि्वट कंगनाने केले होते. कंगनाच्या टि्वटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप याचिकाकर्ते बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी बांद्रा न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला होता. याप्रकरणी कंगनाला तीन वेळा पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.
हेही वाचा -कंगनासोबत वैयक्तिक वाद नाही, पण उत्तर देणे गरजेचे होते - उर्मिला मातोंडकर
हेही वाचा - कंगना आणि दिलजीत यांच्यात ट्विटर युध्द, उकाळ्या पाकाळ्यांनी चाहत्यांचे मनोरंजन