ETV Bharat / city

Israeli Consulate Threat Call : इस्रायली वाणिज्य दूतावासाला धमकीचा कॉल, एकाला अटक - मॅरेथाॅन फ्युचेरेक्स न्यूज

मॅरेथाॅन फ्युचेरेक्स येथील कार्यालयातील लाईनलाइनवर धमकीचा फोन ( Israeli consulate threat call ) आला होता. फोनवरील व्यक्तीने त्याच्या देशातील मुली व स्त्रीयांना अश्लील शिवीगाळ करत बलात्कार करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Israeli Consulate Threat Call
इस्रायल
author img

By

Published : Feb 24, 2022, 11:30 AM IST

मुंबई - लोवर परेलमधल्या इस्राईल वाणिज्य दूतावासाला ( Israeli consulate threat call ) धमकीचा फोन करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मॅरेथाॅन फ्युचेरेक्स येथील कार्यालयातील लाईनलाइनवर धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने त्याच्या देशातील मुली व स्त्रीयांना अश्लील शिवीगाळ करत बलात्कार करण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

सोमवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आल्यानंतर इस्राईल वाणिज्य दुतवासाने अधिकाऱ्यांनी ना.म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास करत गुन्हा दाखल केला आणि आरोपी मधुर मोहिन याला अटक केली आहे. मधुर हा हरियानाच्या बेलव्हयु सोहाना रोड येथील सेक्टर ४८ चा राहणारा आहे. त्याने अनेक देशात जाण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्याला जाता आले नाही. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास ना.म जोशी मार्ग पोलीस करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.