नवी मुंबई - शिव संग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी दुःख व्यक्त केले व मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली
सातत्यानं लढणारा एक नेता हरपला शिव संग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाच्या बातमीमुळे प्रत्येक व्यक्तीला दुःखद धक्का बसला आहे मेटे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयाला भेट दिली होती विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व दूर्दैवी आहे या घटनेवर माझा विश्वास बसला नाही मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे तर राजकारणाची कधीच भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे
हेही वाचा - Chandrakant Patil श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्याच्या मोहिमेचे चंद्रकांत पाटलांनी केले होते नेतृत्व