ETV Bharat / city

Pravin Darekar : प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल; सुडभावनेने कारवाई केल्याची देरेकरांची प्रतिक्रिया

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फॉर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. (Case Registered Against Pravin Darekar) दरम्यान, विविध मार्गाने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा हा प्रयत्न असून मी न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. तसेच, ही कारवाई सुडभावनेने केली आहे असही दरेकर यावेळी म्हणाले आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

author img

By

Published : Mar 15, 2022, 10:27 AM IST

Updated : Mar 15, 2022, 11:04 AM IST

मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Registered Against Pravin Darekar) फॉर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, विविध मार्गाने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा हा प्रयत्न असून मी न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. तसेच, ही कारवाई सुडभावनेने केली आहे असही दरेकर यावेळी म्हणाले आहेत.

आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे

प्रविण दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला होता. त्या आधारावर हा गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे कालच विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दरेकर यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करता असे विधान केले होते.

पेन ड्राईव्ह बॉम्ब' न देता आम्ही अहवालच देऊ

धनंजय शिंदे यांनी केलेल्या आरोपात असे म्हटले आहे की, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत आहेत. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात प्रवीण दरेकर हे बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. (२०१४-१५ ते २०१९- २०)या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास २००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणाताही 'पेन ड्राईव्ह बॉम्ब' न देता आम्ही आपणास थेट हे अहवालच देण्यास तयार आहोत असही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले आहे.

रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची 'मजूर' असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले. त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला. तसेच, सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबई बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला आहे असही धनंजय शिंदे म्हणाले आहेत.

प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे'त मजूर म्हणून नोंदणी

प्रवीण दरेकर यांची ज्या 'प्रतिज्ञा सहकारी मजूर संस्थे'त मजूर म्हणून नोंदणी आहे, तेथे कागदोपत्री दरेकर हे 'रंगारी' मजूर असल्याचे दिसते. भ्रष्टाचाराचा बराच रंग (चुना) त्यानी गेले अनेक वर्ष मुंबई बँकेला लावला आहे. सहकार विभागाच्या अहवालानुसार प्रतिज्ञा मजूर संस्थेतील मजूर म्हणून नोंद असलेले जवळपास सर्व सदस्य हे बोगस मजूर आहेत. त्यामुळे सहकार विभागाने प्रतिज्ञा मजूर संस्थेचे पाच वर्षांचे लेखा परीक्षण करून मागील पाच वर्षात प्रवीण दरेकर या बोगस व श्रीमंत मजुराने नेमकी किती मजुरीची कामे केली व किती मजुरी यासाठी त्याना मिळाली याचा लेखाजोखा मांडावा अशी आम आदमी पार्टीची मागणी केली आहे.

अन्यथा पंतप्रधान मोदी यांची भूमिका आपणास मान्य नाही

दरम्यान, जर आपणास पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा, भ्रष्टाचार मुक्त ही भूमिका मनापासून मान्य असेल तर आपण प्रवीण दरेकर याची तात्काळ पक्षातून हकालपट्टी कराल. अन्यथा पंतप्रधान मोदी यांची भूमिका आपणास मान्य नाही असे महाराष्ट्रातील जनता मानल्याशिवाय राहाणार नाही. आयात दरेकरांना भाजपने आतातरी नारळ द्यावा आणि ओरिजनल भाजपच्या चांगल्या आमदाराला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी धनंजय शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी योग्य, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय

Last Updated : Mar 15, 2022, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.