ETV Bharat / city

कुख्यात गुंड एजाज लकडावालावर 2 कोटीच्या खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल - एजाज लकडावालावर गुन्हा दाखल

लकडावाला यांनी जून 2013 ते मार्च 2017 या दरम्यान व्यावसायिकाला अनेकदा धमक्या दिल्याचा आरोप आहे. मात्र जीवाच्या भीतीने पोलिसात धाव घेतली नाही. लकडावालाच्या अटकेची बातमी पाहिल्यानंतर त्याने धमकवलेले अनेक व्यावसायिक आता पोलिसांपुढे येऊन आपली तक्रार नोंदवत आहे.

कुख्यात गुंड एजाज लकडावाला
कुख्यात गुंड एजाज लकडावाला
author img

By

Published : Mar 4, 2022, 11:18 AM IST

मुंबई - कुख्यात गुंड एजाज लकडावाला याच्यावर वाकोला पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर मुंबई सेंट्रल येथील एका व्यावसायिकाकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

लकडावाला यांनी जून 2013 ते मार्च 2017 या दरम्यान व्यावसायिकाला अनेकदा धमक्या दिल्याचा आरोप आहे. मात्र जीवाच्या भीतीने पोलिसात धाव घेतली नाही. लकडावालाच्या अटकेची बातमी पाहिल्यानंतर त्याने धमकवलेले अनेक व्यावसायिक आता पोलिसांपुढे येऊन आपली तक्रार नोंदवत आहे. लकडावाला यांना जानेवारी 2020 मध्ये पाटणा जंक्शनजवळील मिठापूर ओव्हरब्रिजवरून अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे पाठवण्यात आले आहे. पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी व्यायसायिकाला दिली होती. या प्रकरणी लकडावाला आणि व्यावसायिकाची माहिती पुरवणाऱ्या साथीदाराविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लकडावाला याच्याविरोधात मुंबईत 25 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हा गुन्हा अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग होऊ शकतो.

लकडावाला यांच्यावर 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत -

एजाज लकडावाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा आहे. त्याच्यावर 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये खून, खंडणी, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. एजाज 2004 मध्ये रुग्णालयातून पळून गेला होता. 2008 पासून पोलिसांना लकडावालाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. छोटा राजन टोळीचा सदस्य एजाज हा मुंबई आणि दिल्लीतील 24 हून अधिक प्रकरणांमध्ये हवा आहे. ज्यात खून आणि खंडणीच्या अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे.

छोटा राजनने लकडावाला यांच्यावर हल्ला

एकेकाळी जोगेश्वरी परिसरात राहणारे लकडावाला यांनी वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लॉस शाळेत शिक्षण घेतले. 2004 मध्ये छोटा राजनने छोटा शकीलशी संगनमत केल्याच्या आरोपावरून एजाजवर बँकॉकमध्ये हल्ला केला. त्यादरम्यान तो रुग्णालयातून पळून दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्याचे सांगण्यात आले. 28 डिसेंबर 2019 रोजी मुंबई पोलिसांनी एजाजची मुलगी सोनिया हिला अटक केली होती, ज्यांच्या सांगण्यावरून मुंबई पोलिसांनी एजाजला बिहारच्या पाटणा शहरातून पकडले. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर एजाजची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.

एकेकळी बॉलिवूड आणि उद्योग जगतात होती दहशत

कधी काळी बॉलिवूडसह मुंबईतील मोठ्या व्यावसायिकांचे दहशतीच्या जोरावर जगणे मुश्किल करणारा इजाज लकडावाला आता 2 कोटीच्या खंडणी वसुलीच्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गजाआड आहे. पटना पोलिसांनी त्याला जानेवारी 2020 मध्ये मुलींकडून देहविक्री प्रकरणी अटक केली होती. 2003 मध्ये लकडावाला दाऊद इब्राहिम गँगच्या हल्ल्यात मारला गेल्याची अफवा पसरली होती. मात्र लकडावाला त्या हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. एजाज लकडावालाने छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याने दाऊद इब्राहिम नाराज होता. त्यामुळेच दाऊद इब्राहिमने त्यांच्यावर हल्ला केला होता. जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर लकडावाला बँकॉकहून कॅनडाला पळून गेला होता. त्यानंतर अनेक वर्ष तो तेथेच राहत होता. लकडावालाविरोधात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी दोन डझनहून अधिक केसेस नोंद आहे. ज्यामध्ये हत्या, खंडणी, धमकावणे, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.